करिश्माला समोर बसवून दीपिकाची चौकशी, फोनही घेतला एनसीबीने

1 min read

करिश्माला समोर बसवून दीपिकाची चौकशी, फोनही घेतला एनसीबीने

दीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असून तिच्याकडून एनसीबीने फोनही काढून घेतला आहे. त्यामुळे दीपिकाला चौकशी दरम्यान कोणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नाही.

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या माध्यमातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड मधील मोठ्या कलाकरांचे ड्रग्स कनेक्शन उघडले केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या बड्या अभिनेत्रींना समन्स बजावले आहे. काही बड्या कलाकरांची चौकशी सूरू आहे. आज सकाळपासून ड्रग्स कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी सुरु आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असून तिच्याकडून एनसीबीने फोनही काढून घेतला आहे. त्यामुळे दीपिकाला चौकशी दरम्यान कोणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नाही.
आज सकाळी पावणे दहा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथील एनसीबीच्या कार्यालयात दीपिका हजर झाली. त्यानंतर बरोबर १० वाजता तिची चौकशी करण्यात आली. चौकशी सुरू होण्यापूर्वी एनसीबीने तिचा फोन काढून घेतला. त्यामुळे तिला चौकशी सुरू असेपर्यंत कुणाशीही फोनवरून संवाद साधता येणार नाही. दीपिकाची मॅनेजर करिश्माही १० वाजता एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून दोघींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दीपिकासोबत अभिनेता आणि तिचा पती रणवीर सिंग नाही. त्यामुळे दीपिका एकटीच एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावं लागणार आहे.
दीपिकाची आज चौकशी होणार असल्याने तिच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मीडियानेही तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मात्र, दीपिका रात्रभर तिच्या घरी नव्हती. ती रात्रभर मुंबईतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलात थांबली होती. मीडियाचा ससेमिरा चुकविण्यासाठीच दीपिका हॉटेलमध्ये थांबल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनसीबीकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दीपिकाने रात्रभर तिच्या वकिलांशी चर्चा केली असल्याचेही सांगण्यात आले आहे.