दादा हे वागणे बरे नव्हे

दादांकडे काही लोक आमचे पैसे द्या, आमच्या कामाचे पैसे द्या अशी मागणी करत होते. त्या लोकांना दादांच्या पोलीसांनी जशी वागणुक दिली, ते पाहिल्यावर हे घरातले लाडके दादा आहेत की 'दादागिरीवाले' दादा आहेत, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

दादा हे वागणे बरे नव्हे

महाराष्ट्रः दुसरी लाट ओसरल्याची बातमी आता कानावर येत असतानाच राज्यातल्या तज्ज्ञांनी पुढील दोन-चार आठवड्यात दुसरी लाट येणार, असं सांगुन टाकलं आहे. तिसरी लाट येणार म्हणुन आम्ही सज्ज राहु, यंत्रणा सज्ज राहिल, बाहेर न पडण्याची, मास्क लावण्याची काळजी आम्ही घेऊ. पण आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कंत्राटी तत्त्वावर आणि कायमस्वरुपी कामासाठी तुम्ही जी मंडळी नेमली आहेत, त्यांची काळजी कोण घेणार? त्यांची अवस्था काय आहे, त्यांना काम मिळालं आहे, ते व्यवस्थित करत आहेत का, त्यांना पैसे मिळत आहेत का, याचा विचार करायलाच हवा. असा विचार सरकारमधल्या मोठ्या माणसांनी करायचा असतो. घरातल्या लहान मुलांची काळजी त्यांचा दादा घेत असतो, आणि दादानी आपल्या लहान भावंडांना सांभाळुन घ्यायचं असतं. आपली एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही तरी घरातल्या लहान मुलांचे हट्ट दादा पूर्ण करत असतो.

सरकारमध्ये असेच एक दादा आहेत. ते उस्मानाबादमध्ये कसे छान वागले, याचा व्हिडिओ त्यांच्या समर्थकांनी प्रसिद्ध केला. जोरदार पाऊस पडत होता, पोलीस दादांना सलामी द्यायला आले, त्यांनी उतरल्यावर 'सलामीची गरज नाही' असं सांगितलं आणि पोलीस पुन्हा आडोश्याला गेले. अनेकांनी दादांच कौतुक केलं, तो व्हिडिओ सगळीकडे शेअर केला, परंतु बीडमधल्या त्या व्हिडिओच काय ज्यात दादांकडे काही लोक आमचे पैसे द्या, आमच्या कामाचे पैसे द्या अशी मागणी करत होते.  त्या लोकांना दादांच्या पोलीसांनी जशी वागणुक दिली, ते पाहिल्यावर हे घरातले लाडके दादा आहेत की 'दादागिरीवाले' दादा आहेत, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

दादांची कारकीर्द मोठी आहे, ते स्पष्टवक्ते आहेत, तितकेच ते स्पष्टकर्ते देखिल असतील असं वाटलं नव्हतं. खरंतर आरोग्य कर्मचा-यांना वेळ देऊन, त्यांच्या समस्या जाणुन घेऊन त्या सोडवणं आवश्यक होतं. कारण हे कंत्राटी तत्त्वावर नेमलेले आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालुन काम करत आहेत. डाॅक्टरांच बरं चालु आहे, असं जरी म्हंटल तरी या बिचा-या कर्मचा-यांना दहा बारा हजार रुपयांवर काम करावं लागतं. त्यांच्या समस्या कोण जाणुन घेणार? खरंतर सरकारमधला मोठा माणुस म्हणुन दादांनी हे समजुन घेणं आवश्यक होतं पण या बिचा-या कर्मचा-यांना मारण्यात आलं, त्यांना दिलासा काही मिळालाच नाही, तर सुजलेली पाठ घेऊन घरी जावं लागलं. अशा स्वरुपााचा लाठीचार्ज करणा-या पोलीसांना दादांनी रोखलं नाही, तसे आदेशच दिले असं म्हणायला  हरकत नाही.

याच जिल्ह्यात जेव्हा दादा बैठका घेत होते, तेव्हा मराठा आरक्षणासाठी एक कार्यकर्ता एकटाच दादांना निवेदन देण्यासाठी गेला होता. त्यालाही दादांच्या पोलीसांनी अक्षरशः उचलुन बाहेर फेकलं. या स्वरुपाची कृती योग्य आहे का? याचा विचार दादांनी आणि सरकारने करणं गरजेचं आहे. त्यांनीच सांगितलं की, 'बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही'. या दोन जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी दादा आले होते. लोकांना त्यांना भेटण्याची ईच्छा होणं स्वाभाविक आहे. दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री दादांच्या सोबत होते. खरंतर, तुमच्या जिल्ह्यातील यंत्रणा चांगली करा, असे आदेश त्यांना देणं अपेक्षीत होतं. एका क्षणात दादांनी जिल्हाधिका-यांना आदेश दिला असता तर कदाचीत आरोग्य कर्मचा-यांचे पैसेसुद्धा मिळुन गेले असते. पण तसं घडलं नाही.

दादांना या विषयात कधीच चांगलं बोलावं वाटलं नाही, कर्मचा-यांची मागणीही कधी ऐकुन घ्यावी वाटली नाही. यावर विरोधकांनीही टिका केली आहे. पंकजा मुंडे जेव्हा ओबीसी आरक्षणासंबंधात देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेल्या होत्या, तेव्हा बाहेर त्यांना मुंबईच्या माध्यमांनी गाठलं. त्यावेळी यासंदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे, "आरोग्य कर्मचा-यांना अशा प्रकारची वागणुक देणं हे  अत्यंत संतापजनक आहे, ते आपल्या जिवाची पर्वा न करता गेलं दिड वर्ष आपली सेवा करत आहेत, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर पुन्हा एकदा आपल्याला त्यांच्याच मदतीची आवश्यकता भासणार आहे, त्यामुळे त्यांना किमान दही मिनिटांचा वेळ देऊन त्यांच्या अडचणी अजित पवारांनी जाणुन घेणं गरजेचं होतं. परंतु त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, ही अपेक्षा अजित दादांकडून नव्हती." अशा शब्दांत त्यांनी टिका केली.

आरोग्य कर्मचा-यांना खुप चांगली वागणुक मिळणं अपेक्षित असताना सुद्धा सातत्याने त्यांना मारहाण केली जात आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, मग तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी आपल्याला त्यांची मदत कशी मिळेल? त्यांच्या शिवाय हे सरकार तिस-या लाटेचा सामना निट करु शकेल का? हा प्रश्न देखिल महत्त्वाचा आहे. परंतु सरकारमधील मंडळींना याची खंत, खेद नाही. त्यांना केवळ आपलं सरकार चालवायचं आहे, ते वाचवायचं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.