चोरी करुन फरार आरोपी अटकेत, मुद्देमाल हस्तगत

२४ तासात आरोपींना अटक करत माल हस्तगत करण्यात सोनपेठ पोलीस यशस्वी

चोरी करुन फरार आरोपी अटकेत, मुद्देमाल हस्तगत

सोनपेठ : शहरात सोमवारी गुन्हेगारांनी हायटेक विचारातून गुन्हा केला खरा! मात्र, म्हणतात ना पोलीस के हात बडे लंबे होते है! या उक्तीप्रमाणेच सोनपेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत या दोन्ही गुन्हेगारांना गजाआड करत सद्रक्षणाय खलनिग्रहणाय याप्रमाणे आम्ही सदैव रक्षणकर्ते असल्याचे दाखवून दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवार २३ ऑगस्ट रोजी आठवडी बाजारसाठी सायखेडा येथील पासष्टवर्षीय एक महीला सोनपेठला आली असता दुपारी २ च्या सुमारास सदर महीलेस दोन अनोळखी इसमानी येऊन आम्ही गरीब महिलांना साड्या वाटप करत आहोत असे म्हणत तीला सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आणून तीच्या अंगावर असणारे दागिने यात सोन्याच्या मण्याची माळ,नथ,चांदीच्या पाटल्या हे अंगावर असल्याने साड्या भेटणार नाहीत फोटो काढेपर्यंत हे दागिने अंगावरून काढून टाक म्हणून सांगताच सदर महीलेने दागिने काढून पिशवीत ठेवताच या दोघांही इसमानी तीच्या हाताला हिसका देऊन हातातील पिशवी हिसकावुन पोबारा केला होता.

सदरच्या गुन्ह्याची तक्रार महिलेने सोनपेठ पोलीस स्थनाकात केली असता. गु.र.न.सी.आर.न.१९३/२१कलम ३९२,४२०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानुसार महिलेने दोन्ही आरोपीच्या वर्णन व कपडे याबाबत ओळखत असल्याचे सांगताच सोनपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिरी यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत तपासास सुरुवात केली असता अवघ्या चोवीस तासाच्या आत दोन्ही आरोपींना पालम येथून अटक करण्यात आली.

यासाठी पोलीस हवालदार वंजारे,महेश कौठाळे,करवर पालम पोलिसांनी मोलाची मदत केल्याची माहिती पी.एस.आय.गिरी यांनी दिली. दरम्यान सोनपेठ पोलीस कामाच्या बाबतीत कात टाकत असल्याचे दिसते. यात केवळ माहीतीवरुन ८० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आरोपींना पकडण्यात आल्याने पोलिसांबाबत विश्वासार्यता घट्ट झाल्याची चर्चा होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.