विविध विकास कामांसाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर- आ.डॉ.राहुल पाटील

प्रभाग क्रमांक चार मधील विविध विकास कामांसाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर

विविध विकास कामांसाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर- आ.डॉ.राहुल पाटील

परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये राहणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून, येत्या काळात परभणी शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील आशीर्वाद नगर येथे दुर्गा देवी मंदिर जवळील कॅनलवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे निर्मितीसाठी ६० लक्ष रुपये, याच प्रभागातील सोपानराव अवचार यांचे घर ते आळसे गुरुजींच्या घरापर्यंत च्या सिमेंट काँक्रीट रोड व नाल्याच्या बांधकामासाठी २२ लक्ष रुपये, उघडा महादेव परिसर ते एमआयडीसी ला जोडणाऱ्या रोडच्या निर्मितीसाठी दोन कोटी रुपये , सुंदराईनगर येथील पुलाच्या निर्मितीसाठी ६० लक्ष रुपये तसेच या प्रभागातील विविध विकास कामांच्या निर्मितीसाठी साडेचार कोटी रुपये असे एकूण आठ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली असल्याचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितले.

आज आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक चार मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले .या प्रसंगी महापौर रवी सोनकांबळे,उपमहापौर भगवानराव वाघमारे,सहसंपर्क प्रमुख डाॕ. विवेक नावंदर,उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे,मनपा गटनेते चंदू शिंदे, मनपा सदस्य प्रशांस ठाकूर,अतुल सरोदे,अक्षय देशमुख, विशाल बुधवंत ,सुशील कांबळे ,रवींद्र पतंगे ,अरविंद देशमुख ,तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार ,शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा प्रभाग क्रमांक चार मधील सर्व नागरिक, व्यापारी आणि महिला भगिनी यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशहर प्रमुख राहुल खटिंग ,मकरंद कुलकर्णी ,दिलीप गीराम ,प्रशांत शिंदे ,गोपाळ कदम ,बाबू फुलपगार, दीपक शिंदे ,राजू कदम, राजू महामुनी ,राजू पिंगळकर, उद्धव मोहिते, मारुती तिथे, हेमराज चोपडे, विनोद हाके, रवी मोटे, शिवप्रसाद माटोरे,विठ्ठल भोसले ,प्रदीप जाधव,पिंटू गिराम,अंकुश काळे,रोहित वाकडे,नागेश सुकळीकर, राजेश जाधव ,गुलाब देवरे ,उद्धव सवंडकर,मुंजाजी शेळके, संतोष डहाळे,पिंटू कदम आदी शिवसेना युवा सेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.