श्रीराम जन्मभूमीसाठी परभणीत २ कोटी ५६ लाख रूपये निधी संकलन

परभणीlतील ८८४ गावे, वाडी, वस्तीवर जावून दोन कोटी ५६ लाख ७८ हजार २२ रुपयांचे निधी संकलन १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान हे निथी संकलन अभियान स्थापित समितीच्या पदाधिकार्‍यांसह हजारो रामभक्तांव्दारे राबविल्या गेले होते.

श्रीराम जन्मभूमीसाठी परभणीत २ कोटी ५६ लाख रूपये निधी संकलन

परभणी: श्रीराम जन्मभूमीत तीर्थक्षेत्र विकास निधी समर्पण महाअभियानात परभणी जिल्ह्यात हजारो रामभक्तांनी शहरासह तालुके, गावे, वाडी, तांडे, वस्तीपर्यंतच्या २ लाख ८८ हजदार ६२६ कुटूंबांबरोबर संपर्क साधून मंदिर निर्माण कार्याकरिता २ कोटी ५६ लाख ७८ हजार २२रुपये एवढा निधी संकलीत केला. जिल्ह्यात १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान हे निथी संकलन अभियान स्थापित समितीच्या पदाधिकार्‍यांसह हजारो रामभक्तांव्दारे राबविल्या गेले होते.

विशेषतः या अभियाना दरम्यान जिल्ह्यातील संत-महंत, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवरांनी निधी संकलनासंदर्भात विविध माध्यमातून आवाहन केले. पाठोपाठ विविध समाजमाध्यमे, पोष्टर्स, बॅनर्स, स्टीकर्स, आवाहन पत्रके आदी प्रचार साहित्य तसेच गावातील भजनी मंडळे, महिला, वारकरी तसेच रामभक्तांनी दिंडी, गावातून प्रभात फेरी व अऩ्य माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली. कारसेवकांचे अनुभव कथनही फेसबुकवरील व्याख्यानमालेच्या युवकांना प्रेरणादायी ठरली. मातृशक्तीने आयोजित केलेल्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित भव्य रांगोळी स्पर्धा आकर्षण ठरली. या विविध उपक्रमांचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती झाली. या नियोजनबध्द अभियानातून परभणी महानगरासह तालुकास्थाने, तसेच ग्रामीण भगातील गावे, वाडी, तांडे व वस्त्यांवरील प्रत्येक कुटूंबापर्यंत रामभक्तांनी या कालावधीत संपर्क केला. भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी यथायोग्य समर्पणाचे आवाहन केले होते.

जिल्ह्यात ८८४ गावे, वाडी, वस्तीवर जावून श्रीराम समर्पण निधी संकलीत केला. मंदिर निर्माणासाठी रामभक्तांनी दोन कोटी 56 लाख 78 हजार 22 रुपये इतका निधी समर्पित केला. निधी हा कुपन व पावतीव्दारे जमा करण्यात आला. तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून थेट अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.

या निधी संकलनाबरोबर राम मंदिर बांधकामाची माहिती रामसेवकांनी जिल्ह्यात सर्व राम भक्तांपर्यंत पोचवली. नऊ तालुक्यांमध्ये व परभणी शहरामध्ये सामाजिक सदभाव बैठकांमध्ये ४६ ज्ञातींचे (जातींचे) प्रतिनिधींत्व करणारे २५५ राम भक्तांचा सहभाग होता. चार महिला मेळावे ४३४ महिलांच्या उपस्थीतीत पार पडले. जिल्हयात एका समेलनात ४८ संत महंतांचा सहभाग हा लक्षणीय ठरला, अशी माहिती श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी संकलन समिती अध्यक्ष ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी दिली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ.केदार खटिंग, विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे, प्रल्हादराव कानडे, जिल्हाप्रमुख सुनील रामपूरकर, अभियानप्रमूख गणेश काळबांडे, संतोष देवढे, राजन माणकेश्वर, चंद्रकांत अल्नुरे, प्रशांत कायंदे, तसेच रा. स्व. संघाचे विभाग कार्यवाह रमेशराव जाधव व जिल्हा कार्यवाह माणिक माटे आणि जिल्हा प्रचारक विकास देशपांडे उपस्थित होते.

घरफोडी करून साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास
४ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केले.
परभणीत बांधकाम कामगार म्हणून हजारो व्यक्तींची नोंदणी बोगस
प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिका-यांना दिले निवेदन. कामगार म्हणून हजारो नागरिकांनी बोगस नोंदणी केली असून त्याव्दारे एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या रकमा पध्दतशीरपणे लाटल्या जात असल्याचा आरोप प्रहारने केला आहे.
रिसेप्शनला गर्दी केल्याने कारवाई
रिशेप्शनमध्ये ५० पेक्षा अधिक व्यक्तींना जमाल्याने १५ हजारांचा दंड ठोठावला .

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.