'सिल्व्हर ओक'वर भेटीचं सत्र सुरुच!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यानंतर आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.

'सिल्व्हर ओक'वर भेटीचं सत्र सुरुच!

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्या भेटीचं सत्र अद्याप संपलेलं नाही. मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासुन राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने या भेटीला विषेश महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्वीटर हँडलवर या नेत्यांच्या भेटीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं या ट्वीटमध्ये म्हंटलं आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय वातावरणात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

भेटीनंतर थोरात यांनी प्रसारमाध्यमांना बोलतांना म्हटलं की, 'शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत. आज त्यांच्या भेटीला गेलो तेव्हा महामंडळाच्या जागा वाटपावर आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली. सत्तेतील तिन्ही पक्षांना महामंडळाच्या समान जागा मिळतील. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आमचं सरकार गंभीर असुन मराठा समाजाच्या बाजुनेे आहे. खासदार संभाजराजे माझ्याकडे येवून गेले, त्यांनी काही अपेक्षा केल्या, त्यावर आम्ही गंभीर काम करत आहोत. राज्यातील सरकार मराठा समाज्याच्या बाजुने आहे,' असे ते म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सध्या अनेक विषयांवरुन कुरबुरी आहेत. निधी वाटपाविषयी काँग्रेसची तक्रार जुनीच आहे. त्यातच पुढील विधानसभा निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार अशी घोषणा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. २०२४ मध्ये काँग्रेस महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष असेल असं त्यांनी म्हंटलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षांच्या वेगवेगळ्या भुमिकांमुळे आजची भेट अधिक महत्त्वाची ठरली आहे.  


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.