यापुढील जीवन योगेश्वरी परिवाराचा सेवार्थी म्हणून कारखाना परिवारास अर्पण-माजी आ.आर.टी.देशमुख

1 min read

यापुढील जीवन योगेश्वरी परिवाराचा सेवार्थी म्हणून कारखाना परिवारास अर्पण-माजी आ.आर.टी.देशमुख

कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिवाळी गोड.

​सिध्देश्वर गिरी/परभणी:​ शेतकऱ्यांच्या विश्वासास ठरलेल्या पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर या एकमेव खाजगी तत्त्वावरील साखर कारखान्याच्या १९ व्या गळीत हंगामास कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आमदार आर.टी.देशमुख यांच्या हस्ते मोळी टाकून प्रारंभ झाला. यावेळी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी आ.आर.टी.देशमुख यांनी यापुढील काळात सामान्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे सांगत मागील वर्षीच्या गळीत हंगामात गाळपास दिलेल्या शेतकऱ्यांना एफ.आर.पी.देयकानुसार १८० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा करत असल्याची घोषणा सुरुवातीलाच केली.यामुळे उपस्थित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आंनद दिसून आला.यावेळी त्यांनी पुढे बोलताना सांगितले की,माझ्यासारख्या सामान्य माणसाला हा कारखाना चालवण्याची संधी मिळाली यामुळे मी धन्य झालो असल्याचे गौरव उद्गगार काढत.लोकांची सेवा करण्याचा स्वभाव आमचा आणि आमच्या कुटुंबाचा आहे.
त्यामुळे होत असणाऱ्या सेवेमुळे समाधान व्यक्त करत या पुढील जीवन कारखाना आणि कर्मचारी यांना अर्पण करत असल्याचे सांगत. मागील वर्षीच्या गळीत हंगामास माझ्यावर ओढवलेल्या आजारपणाच्या संकटामुळे उपस्थित नव्हतो, अशी खंत व्यक्त करत आज एफ.आर.पी.प्रमाणे १८० रुपये जमा केले आहेत. मात्र यापुढील काही दिवसात मागील वर्षी गाळपास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न नक्की करील असे आश्वासनही माजी आमदार देशमुख यांनी यावेळी दिले.
योगेश्वरी शुगरच्या माध्यमातून स्व.गोपीनाथ मुंडे,स्व.अशोक सामत यांनी लावलेले झाड कर्मचारी आणि शेतकरी यांच्या सहकार्याने वटवृक्ष झाल्याचे दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास देण्याचे आवाहनही त्यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर पी.एस.देशमुख यांनी केले यावेळी या कार्यक्रमास हरीभाऊ देशमुख,एम.टी.देशमुख,जे.टी.देशमुख,मॅनेजिंग डायरेक्टर ॲड.रोहीत आर.देशमुख,अश्रोबा कडपे,बळीराम कडपे,राहुल देशमुख,डॉ.अभिजीत देशमुख,बबन देशमुख,मनोज देशमुख,तुषार देशमुख,सचिन देशमुख कारखान्याचे प्रमोटर गंगाधर गायकवाड,लक्ष्मीकांत घोडे,इंदरराव कदम,सुदामराव सपाटे,बबनराव सोळंके,विनोद देशमुख कारखाना अधिकारी आर.एम.तौर,बी.व्ही.करांडे,अनंत बावणे, पी.ए.हेडे,डी.आर.मोकाशे,एस.जे.सावंत,एम.एन.डोंबे,मोहन देशमुख यांच्यासह ऊसउत्पादक शेतकरी,ऊसतोड कामगार,ठेकेदार कर्मचारी,कामगार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.