गादीया समुहाचे मंगलम ठरणार वरदान

औरंगाबादेतील गादिया समुहाच्या मंगलम केटरर्सने कोरोनाशी लढण्यासाठी क्लाऊड किचन ही संकल्पना पुढे आणली आहे. शुध्द, स्वच्छ आणि टिकाऊ अन्न जलद गतीने महाराष्टाच्या कानाकोप-यात पोहचविण्याची ही संकल्पना आहे.

गादीया समुहाचे मंगलम ठरणार वरदान

IMG-20200410-WA0008

कोरनाच्या महामारीमुळे सगळं जग आज संकटात आले आहे. १३० कोटी लोकसंख्या आणि कश्मीर ते कन्याकुमारी असा विस्तार असलेला आपला देश देखील आता लॉक डाऊन झाला आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात एवढे दिवस संपूर्ण भारतात रेल्वेची चाके कधीच थांबली नव्हती ती यावेळी थांबली आहेत. सगळं जग स्तब्ध झाले आहे. कारखाण्याची धडधड, बांधकामांची गडबड, मुंबईची धडपड सगळेच आता थांबले आहे.

हे वातावरण अधिक चिंतेचे आहे. सोबत भारतीयांची परीक्षा बघणारे आहे. आपण सगळेच मिळून या महामारीचा मुकाबला करत आहोत. अनेक सेवाभावी संस्था, उद्योजक आणि समाजसेवक काम करत आहेत. प्रत्येकांनी आपला वाटा उचलला आहे.

अनेक संस्थानी अडकलेल्या लोकांसाठी अन्नपुरवठा करण्याचा वसा उचलला आहे. यात सर्वात आवश्यक घटक म्हणजे महाराष्ट्र पोलीस आहेत. व आपले जिगरबाज आरोग्य सैनिक आहेत. आपल्या आरोग्याची आणि कुटूंबाची काळजी न करता लोकांच्या सेवेसाठी ही मंडळी प्रयत्न करत आहेत.

या लोकांना किमान वेळेवर अन्न आणि पाणी मिळावे यासाठी वेगवेगळ्या संस्था आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. प्रत्येक ठिकाणी जमेल तेथे अन्न शिजवले आणि पोहचविले जात आहे. अनेक ठिकाणी सदभावना म्हणून शिजवले जाणारे अन्न हायजिन असेलच याची खात्री नसते. तसेच ते बघण्यासाठी वेळ देखील नसतो. सेवा पुरविणे ही सगळ्यात पहिली प्राथमिकता असते. त्याची वाहतुक देखील असुरक्षीत पध्दतीने होऊ शकते.

म्हणूनच 'मंगलम' या गादिया उद्योग समुहाला ही कल्पना सुचली. आणि या संकट काळात अत्यंत स्वच्छ, सुरक्षीत आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी क्लाऊड किचन ही संकल्पना पुढे आली.

शिरीष गादिया यांच्या संकल्पनेनुसार आज औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एक भव्य किचन तयार करण्यात आले आहे. यात २५ वेगवेगळे अंतर राखत किचन तयार करण्यात आले आहेत. एका किचन मध्ये एका शिफ्ट मध्ये चार हजार या प्रमाणे एकाच वेळी एक लाख लोकांचे जेवण बनविण्याची तरतुद करण्यात आली आहे.

औरंगाबादच का?

मोठी मोठी शहरे असताना हा प्रयोग औरंगाबादेत का असा प्रश्न पडणे साहजिक आणि स्वाभाविक आहे. खरेतर आताच्या स्थितीत असा मोठा स्वयंपाक घराचा प्रयोग करण्यासाठी इतकी प्रशस्त आमि मोठी जागा महानगरात मिळणे कठीण आहे. तसेच मुंबई पुणे या शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. अशा स्थितीत कांहीशे लोकांना कामासाठी बोलाविणे सुरक्षीत नाही. नागपूर सारखी शहरे अन्य महाराष्ट्रापासून दूर आहेत. औरंगाबाद मध्य महाराष्ट्रात येते आणि येथून विमान रेल्वे आणि रस्ते वाहतुक सोयीची आहे. स्थान, कन्केटीव्हीटी पाहता भविष्यातील डिजास्टर मॅनेजमेंटसाठी औरंगाबाद हे सोयीचे ठिकाण आहे.

स्वच्छतेची पूर्ण काळजी

येथे शिजविण्यात येणारे अन्न सामाजिक अंतर आणि सुरक्षीतेतचे निकष पाळून पूर्ण करण्यात येणार आहे. येथे प्रवेश करतानाच प्रत्येक कर्माचारी सॅनिटाजर चेंबर मधूनच प्रवेश करेल. त्याच्या आधी त्याच्या निर्जंतुकीकरणाची पूर्ण प्रकिया पार पाडलेली असेल. मास्क, हँड ग्लोव्हज आणि डोक्यावर आवरण या गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टी रोज बदलण्यात येतील.

सेंट्रल किचनला लागूनच स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. ज्यात तयार अन्न आणि कच्चा माल याची तापासणी करण्यात येईल. त्यासोबत येथे एक हॉस्पीटल देखील तयार करण्यात आले ज्यात काम करणा-या व्यक्तीला कोणता आजार झाला तर त्याला तत्काळ बाजुला नेऊन उपचार करता येतील अथवा कामाला लागण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी करता येईल.

हा परिसर पूर्ण बंदिस्त असल्याने अनावश्यक व्य्क्ती प्राणी, पशुपक्षी यांचा प्रवेश देखील वर्जीत आहे. परीसराचे पूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच येथे अन्नाचे वाटप होणार नसल्याने गर्दी देखील होणार नाही.

औरंगाबाद शहरात आवश्यकता असेल त्या ठिकाणी गादिया परिवारच्या मंगलमच्या वतीने निर्जुंतुक केलेल्या वाहनातून आणि व्यक्तीद्वारे अन्न पुरवठा करण्यात येईल.

वेगवान पुरवठ्याची जबाबदारी

तसेच राज्यातील अन्य भागात वेगवान पुरवठा व्हावा यासाठी स्पाईस जेट या विमान वाहतुक करणा-या कंपणीसोबत एअर कार्गोचा करार देखील होत आहे. राज्यातील कोणत्याही शहरात एक तासात तर तिथून थेट गरजूपर्यंत पुढील एक तासात अन्न पोहचविण्याची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नांदेड, लातूर सारख्या शहरात आणि जिथे विमान सेवा देता येईल अशा शहरात वेगवान पुरवठा करता येणार आहे. तसेच औरंगाबाद लगतच्या जालना, बीड, अहमनगर, धुळे, जळगाव, नाशीक शहरात वेगवान पुरवठा करणे शक्य आहे. सध्या लॉक डाऊन असल्याने रस्ते देखील मोकळे आहेत त्यामुळे ट्राफिक जाम सारखी समस्या उद्भवणार नाही.

खराब होणारे पदार्थ टाळणार

उन्हाळ्याचे दिवस असल्याने अन्न लवकर खराब होणार नाही अशाच स्वरूपात ते बनविण्यात येत आहे. उन्हाळ्यात लवकर खराब होणा-या भाज्यांचा समावेश या अन्नात करण्यात आला नाही. जसे टोमॅटो लवकर खराब होतात. म्हणून याचा वापर सर्वथा वर्ज्य करण्यात आला आहे.

सर्व शासकीय परवानगी घेतल्या

सामाजिक जाणिव म्हणून हा प्रकल्प असला तरी सर्व शासकीय परवानगी यात घेण्यात आल्या आहेत. महानगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस आयुक्तालय यांच्या परावनगी देखील घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही संस्थेला येथून अन्नाची पाकीटे करून घेतना कोणतीही शंका अथवा भय बाळगण्याचे कारण उरणार नाही. सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते एक सुरक्षीत आणि शुध्द अन्न पाकिट ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्या हाती मोठ्या विश्वासाने सुपूर्द करू शकतील.

भविष्य काळाची उपाययोजना

भविष्यात कोणती आपत्ती न येवो या सदिच्छेसह .. आपल्या देशात कोणती अशी नैसर्गीक आपत्ती आलीच तर त्याच्याशी मुकाबला करताना अन्न ही समस्या बनू नये यासाठी ही यंत्रणा अथवा अशी यंत्रणा अंमलात आणता येऊ शकते. त्यासाठीच हा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात येत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.