विदर्भातील अनेक शहरे नागपूरशी जोडणार-गडकरी

दीड वर्षात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे नागपूरशी जोडण असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे.

विदर्भातील अनेक शहरे नागपूरशी जोडणार-गडकरी

नागपूरः केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील शहरे,नागपूर मेट्रोशी जोडणार असल्याचे महत्तवपूर्ण घोषणा त्यांनी केली आहे. अमरावती येथे एका महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते म्हणाले की नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे.

येत्या दीड वर्षात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे नागपूरशी जोडण्याचे नियोजन केले आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासा इतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांना पुढे येण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. विदर्भात अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.