गजाननाने उभे केले संतोषीचे आयुष्य

1 min read

गजाननाने उभे केले संतोषीचे आयुष्य

आई-वडिलांच छत्र हरवलेल्या संतोषीच्या यशाची कहाणी

लातूर : बालवाडीत असताना वडिलांच छत्र हरवलं थोडी मोठी असताना कळत्या वयात आई गेली. मायबापाचा छत्र हरवले असताना. खलंग्रीतील गजानन बोळंगे यांनी त्या मुलीचा मायबाप होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 12 व्या वर्षांपासून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला.तिने 12 वीत मिळवले 92% टक्के गुण.

सामाजिक कार्यकर्ते गजानन बोळंगे शैक्षणिक साहित्य वाटप करताना.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खलंग्री गावातील मुलगी संतोषी बिभीषण पालके हिने 12 वाणिज्य शाखेतून 92% टक्के गुण घेऊन लातूर मधील दयानंद महाविद्यालयातून 12 वा क्रमांक मिळवला.तिच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे पण या यशामागे तिचा संघर्ष आणि त्यात सामाजिक कार्यकर्ते गजानन बोळंगे यांनी दिलेली साथ त्याचं हे फळ आहे. 4 वर्षाची असताना संतोषीच्या वडिलांच निधन झालं. थोडी मोठी असताना आईचं दीर्घ आजाराने निधन झालं वयाच्या 12 व्या वर्षी आई-वडिलांच छत्र हरवलेल्या संतोषी च्या आयुष्यात सर्वत्र अंधार होता.ती अभ्यासात हुशार व जिद्दी होती. तिची शिकण्याची जिद्द बघून गजानन ने तिला दत्तक घेतले व तिचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला. 10 वी मध्ये तिने 91.20% टक्के गुण घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध करून गजाननचा विश्वास सार्थ ठरवला.10 वी तर पास झाली पण पुढे काय होईल या विचाराने ती खचली असता गजानन बोळंगे नी तिला पुन्हा धीर देत आपली जबाबदारी पार पाडली.
WhatsApp-Image-2020-07-20-at-3.25.17-PM
संतोषीने सगळण्याचा विश्वास सार्थ ठरवत 12 वी मध्ये 92% टक्के गुण घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिच्या यशाचं सगळीकडे कौतुक होत आहे. तिला दोन भाऊ आहेत एक 10 वीला आहे व दुसरा आयटीआय च शिक्षण घेत आहे.