
लडाखः भारत-चीन सैनिकांमध्ये लडाखच्या गालवन खो-यात चकमक झाली. या चकमकीमध्ये भारताचे कमांडिंग ऑफिसरसह 20 जवान शहीद झाले आहे. तर 135 जवान जखमी झाले आहे. यातील 4 जवानंची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. 15-16 जून दरम्यान रात्री गालवान खो-यामध्ये ही चकमक झाली होती. या चकमकीमध्ये चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहे. यामध्ये त्यांच्या यूनिट कमांडिंग ऑफिसरचही मृत्यू झाला आहे. ज्या यूनिटने भारतीय सैन्यावर हल्ला चढवला त्याच यूनिटचा कमांडिंग ऑफिसर मारला गेला आहे.
चीनच्या तणावाच्या पार्श्र्वभूमीवर हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पीती आणि किन्नौर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांच्या सीमा या चीनशी जोडलेल्या आहेत. चकमकीच्या जवळपास 36 तासांनंतर पहिल्यांदा भारताकडून निवेदन जाहीर करण्यत आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, गालवान येथील सैनिकांनी मोठे साहस दाखविले आहे. देश त्यांचे बलिदान नेहमी लक्षात ठेवेल. लडाखमधील 14 हजार फूट उंच गलावन खो-यात तीन तास चाललेल्या या चकमकीत जगातील दोन अणु सैन्यामध्ये चकमक झाली. हा हल्ला दगड, लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी करण्यात आला.

भारत-चीन सीमा वादावर प्रतिक्रिया
संयुक्त राष्ट्राचे महासचिवांचा प्रवक्ता म्हणाले की, आम्ही एलएसी वर होत असलेल्या घटनाविषयी माहिती घेतली आहे. दोन्ही देशांनी संयम दाखवावा. दोन्ही देश हे तणाव कमी करण्याच्या विषयावर भाष्य करत आहेत. हीच चांगली गोष्ट आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता व्हइट हाउसमध्ये एक महत्वाची बैठक घेतली. यामध्ये गुप्तचर यंत्रणांनी भारत-चीन वादाचा अहवाल सादर केला. या बैठकीत परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ देखील सहभागी झाले होते. बैठकीनंतर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. अमेरिकेने म्हटले की, आम्ही एलएसीच्या परिस्थितावर बारीक नजर ठेवून आहोत. 20 भारतीय सैन्य जवान शहीद झाले आहेत. यावर अमेरिकेने शोक व्यक्त केला. आमच्या संवेदना सैनिकांच्या कुटूंबियांसोबत आहे.

आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. भारत आणि चीनने चर्चा करुन प्रश्न सोडवाव. हिंसा करुन कोणाचाही फायदा होणार नाही. असे बिटेनेने म्हटले आहे.
गालवान खो-यातील ज्या पेट्रोल पॉइंठवर दोन्ही देशांची चकमक झाली होती. आता तेथे शांततापुर्ण वातावरण आहे. दोन्ही देशांच्या तुकड्या या मागे हटल्या आहेत.