गनीमी काव्याने पालखी शासनाच्या परवानगी विना पंढरपूरात दाखल

1 min read

गनीमी काव्याने पालखी शासनाच्या परवानगी विना पंढरपूरात दाखल

शिवरायांच्या गनीमी काव्याचा वापर करुन रायगडा वरुन शिवरायांची पालखी पंढरपूरात राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता पालखी पंढरपूरात 2 जुलै रोजी दाखल झाली आहे.

पंढरपूर: विठ्ठलाच्या भेटीसाठी संत मंडळी वर्षातून आषाढी एकादर्शीला पंढरपूरात दाखल होतात. या ठिकाणी संत मंडळी एकमेंकाना भेटतात. वारी ही प्रत्येकासाठी आंनदाची आणि उत्सवाची असते. परंतू कोरोनाच्या संकटामुळे यंदा वारी न काढता मानाच्या 9 पालख्या एसटी ने पंढरपूरात दाखल झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेवून परत निघाले आहेत. शिवरायांची पालखी रायगडावरून पंढरपूरात मागील 6 वर्षीपासून येते. यंदा देखील कोरोनाला न घाबरता. सरकारला परवानगी मागितली पण सरकारने ती दिली नाही.म्हणून गनिमी काव्याने पालखी शासनाच्या परवानगी विना पंढरपूरात दाखल झाली.रायगडावरुन शिवरायांची पालखी 9 जून रोजी निघाली होती. ती दशमीला गनिमी काव्याने पंढरपूरात दाखल झाली.

कोरोनामुळे पालखी कोणाच्याही घरी मुक्काम न करता. पालखी झाडाखाली, बंद हॉटेलमध्ये, रस्ताच्या कडेला मुक्काम करत होती. रायगडावरुन 22 दिवस पायी चालत ही पालखीने रायगड ते पंढरपूर असा प्रवास करुन दशमीच्या दिवशी पंढरपूरात दाखल झाली. प्रशासनाला पत्र व्यवहार करुन देखील काहीप्रतिक्रियाआली नसल्याने पालखीला कसलीही परवानगी दिली नाही. 8 एप्रिल पासून एकूण 9 वेळा पत्रव्यवहार केला. तरीदेखील काही उत्तर आले नाही. शेवटी पाच मावळे शिवरायांची पालखी घेवून गनीमी काव्याने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

ज्या शिवाजी महाराज 5 एप्रिल 1663 ला सव्वा लाख सैन्यात घुसुन शाहिस्तखानाचा वधं करुन बाहेर आले. त्या शिवरायाच्या मावळानी शिवरायांच्या पादुका डोक्यावर घेवून चालतना आम्हाला साडे तीन हजारची पोलिस फौज रोखू शकत नाही असे शिव पालखी सोहळातील एका मावळ्याने माध्यमांशी बोलताना म्हटले.