राज्यात स्वच्छ सर्वेक्षणात ६ वा क्रमांक आल्यानंतर कचरा संकलन ठप्प

कगदोपत्री यश मात्र प्रत्यक्षात जैसे थे

राज्यात स्वच्छ सर्वेक्षणात ६ वा क्रमांक आल्यानंतर कचरा संकलन ठप्प

औरंगाबाद- शहराचा कचरा समस्या कायमच धगधगता विषय आहे.कधी कचऱ्यावरुन नागरिक आक्रमक होतात तर कधी प्रशासन. मात्र या आठवड्यात देशाच्या स्वच्छ सर्वेक्षमाची यादी जाहिर झाली आणि त्यात औरंगाबाद राज्यात सहाव्या स्थानी तर देशात २२ व्या स्थानी आहे.यासाठी मनपाने अथक परिश्रम घेतले आणि औरंगाबाद स्वच्छ शहर केले आहे.

मात्र स्वच्छ सर्वेक्षण होताच कचरा संकलन बंद झाले आहे.मनपाने कचऱ्याचे खासगीकरण करुन देखील कचरा संकलन आणि त्यासाठी दिलेला हेल्प लाईन नंबर चार दिवसांपासून बंद आहे.शहरात ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून घंटागाड्या नाॅड रिचेबल आहेत.

मनपाचे हे यश केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात मात्र कचरा समस्या जैसे थे आहे.त्यामुळे नागरिक दुर्गंधाने त्रासले आहेत.यामुळे रोगराईला पोशक असे वातावरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असे म्हंटले तरी चालेल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.