विटा(बु.)येथे ग्रामपंचायतच्या वतीने कचऱ्याची होळी

सभागृहाने घेतला मोकळा श्वास

विटा(बु.)येथे ग्रामपंचायतच्या वतीने कचऱ्याची होळी

सोनपेठ: होळी या हिंदू धर्मातील सणाच्या पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी होळी हा सण साजरा करण्यात आला.यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून आपले कर्तव्य निभावले आहे.यावर्षीच्या होळी या सणावर कोरोना या आजाराचे सावट असल्याने आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिलेल्या संचारबंदीच्या आदेशाचे पालन करत पाथरी तालुक्यातील विटा(बु.)येथे मागील अनेक वर्षांपासून पडीक असणाऱ्या सभागृहाने मोकळा श्वास घ्यावा ही भूमिका शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा विद्यमान सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब आरबाड यांची होती.त्यांच्या प्रयत्नातून माजी खा.गणेशराव दुधगावकर यांनी विटा(बु.)येथे सभागृह निर्मिती करण्यात आली आहे.

सदर सभागृहाचा भांडार गृह म्हणुन वापर होत असे.सदरचे सभागृह सामान्य लोकांसाठी खुले करण्याची मागणी करण्यात येत होती.यातच बाळासाहेब आरबाड यांच्या मातोश्री नुकत्याच सरपंचपदावर विराजमान झाल्या आहेत तेव्हापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांना गती देण्यात आरबाड यांना यश आल्याचे दिसते.नुकत्याच होळी या सणाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाच्या परिसरात साचलेल्या मोकळ्या जागेत व सभागृहात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता.या कचऱ्याची होळी करुन हा सण साजरा करण्यात आला यावेळी ग्रा.प.सदस्य उत्तम हारकाळ उपसरपंच महादेव हारकाळ,प्रकाश हारकाळ,दत्ता देंडगे,बाळासाहेब दळवे,अमीन शेख,दत्ता मोरे,भीमराव आरबाड,मदन आरबाड आदींची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.