लसूण तेल केस आणि त्वचेसाठी गुणकारी

लसूण तेल केस आणि त्वचेसाठी  गुणकारी

लसूण जवळपास प्रत्येक घरात असतोच. लसणात औषधी गुण असतात. तसेच लसणाचा तेलही गुणकारी आहे. लसूण तेल त्वचेवर लावल्याने मुरुमांची समस्या दूर होते. केसांवर लसूण तेल लावल्याने कोंडा दूर होतो. या तेलाच्या वापरामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. कानात होणारे संक्रमण, कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

लसूण तेलाचे केसांसाठी फायदे

  • लसूण तेलामुळे टाळूवरील कोंडा, लाल पुरळ, खाज सुटणे आदी समस्या कमी होतात. टाळू आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. मुलांच्या डोक्यात उवा झाल्या असतील तर लसूण तेल गरम करून लावा. सकाळी केस शॉम्प्यूनं स्वच्छ करा. केस मुळांपासून मजबूत आणि दाट होतात.

  • केस पांढरे होण्याच्या समस्येने आपण त्रस्त असाल तर लसूण तेलचा वापर करू शकतात. केसांवर तेल लावून चांगली मालिश करा. एक तासांनंतर केस शॉम्प्यूनं स्वच्छ करा.

लसूण तेलाचे त्वचेसाठी फायदे

  • लसूण तेलामध्ये एंटी-फंगल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्वचारोग दूर ठेवण्यासाठी हे दोन्ही घटक आवश्यक असतात. खरुज, खाज येणे, सोरायसिस, कॉर्न आदी त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. खाज सुटत असलेल्या भागावर कापसाच्या मदतीनं लसूण तेल लावावं, आराम पडतो. त्वचेचा संसर्ग दूर होतो.

  • मुरुमांच्या समस्येमुळे चेहऱ्यावर डाग पडले असतील तर लसूण तेल चेहऱ्यावर लावावं. चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांच प्रमाणही कमी होतं. मुरुम कमी करण्यास मदत होते. अर्धा चमचे लसूण तेलात मुल्तानी माती मिसळून पेस्ट तयार करा. 15 मिनिटं चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.