आरटीओ कार्यालयाच्या भंगार वाहनांच्या विक्रीचे गौडबंगाल

ऑनलाईन प्रक्रिया संशयास्पद; साईटच ओपन होईना...

आरटीओ कार्यालयाच्या भंगार वाहनांच्या विक्रीचे गौडबंगाल

लातूर : लातूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने आजवर जप्त केलेल्या आणि अनेक वर्षांपासून पडून असलेल्या भंगार वाहनांचा लिलाव जाहीर केला असून हा लिलाव ऑनलाइन होणार आहे, यात मोठे गौडबंगाल असल्याचे सांगितले जात असून याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून विविध कारणांनी वाहने जप्त केली जातात.अशी जप्त केलेली वाहने संबंधित व्यक्तीने सोडवून न नेल्यामुळे ती तशीच पडून राहतात. अशी वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर तसेच शिवाजी चौकातील एसटी डेपो येथे अनेक वर्षांपासून पडून आहेत. या वाहनांचा आता ऑनलाईन लिलाव केला जाणार असून त्यासाठी एक लिंक देण्यात आली आहे.

सोमवारी दि.१५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या कालावधीत हा ऑनलाईन लिलाव होणार आहे.परंतु ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे.मुळात अनेक वर्षांपासून पडून असणाऱ्या या वाहनांचा लिलाव आत्ताच का करण्यात येत आहे?शिवाय लिलाव करायचाच होता तर तो प्रत्यक्ष का केला जात नाही ?असे विचारले जाऊ लागले आहे.जुनी वाहने अथवा भंगार खरेदी करणारी मंडळी या लिलावात सहभागी होतात. यापैकी बरीच मंडळी अशिक्षित असतात. ऑनलाईन लिलाव प्रक्रिया त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे काही ठराविक मंडळींच्या फायद्यासाठीच ही प्रक्रिया ऑनलाइन केली जात आहे का?अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ज्या संकेतस्थळावर या वाहनांचा लिलाव होणार आहे त्यावर अशा हजारो लिलावांची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात त्यात सहभागी होणे अतिशय कठीण असल्याचे जाणवते.त्यामुळे अधिकाऱ्यांना संबंधित अधिकारी कोणाच्यातरी फायद्यासाठी ही प्रक्रिया राबवित असावेत,अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.त्यामुळे परिवहन विभागच संशयाच्या फेऱ्यात अडकला असून ऑनलाइन लिलावाची ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि प्रत्यक्ष लिलाव घेण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.