गावासाठी काम करा, स्थलांतरित मजुरांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आवाहन

केंद्र सरकारच्या वतीने गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

गावासाठी काम करा, स्थलांतरित मजुरांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आवाहन

नवी दिल्लीः कोरोना व लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारनं नविन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीने गरीब विस्थापित मंजुरासाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केले आहे. दि 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ केला आहे. त्यावेळी मोदी यांनी मंजुराशी संवाद साधला.
लॉकडाउन लागू केल्यानंतर विविध राज्यात काम करणारे लाखो मजूर आपापल्या घरी परतले. घरी परतल्यानंतर या मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं आहे. य़ा अभियानासाठी 50 हजार कोटी रुपयांची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यातून रस्ते बांधणीसह ग्रामविकासाला साहाय्यभूत ठरणा-या कामातून रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सरकारनं 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करताना त्यामध्ये 50 हजार कोटी रुपये गरीब कल्याण रोजगार अभियानासाठी दिले आहेत. या अभियानाची सुरुवात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे करण्यात आली आहे.
“ अभियानाचा प्रारंभ करताना ग्रामस्थाशी संवाद साधल्यानं दिलासा मिळाला आहे. करोनाचा शिरकाव झाल्यानंतर अडकलेल्यांना मदत पोहोचलण्याचं काम केलं. घरी परतणा-या मजुरांसाठी रेल्वे सुरु केली. कोरोनाचा संकट इतक मोठं आहे की संपूर्ण जग हादरलं आहे. पण, भारतीय खंबीरपणे उभे राहिले. ग्रामीण भारतानं कोरोनाचं संक्रमण प्रभावीपणे रोखलं आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या संपूर्ण युरोप, अमेरिका, रशियापेक्षा जास्त आहे. इतकी लोकसंख्या असताना कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. आपण जे केलं तितकं काम किंवा त्यापेक्षा अर्धे काम पाश्चिमात्य देशात झालं असतं, प्रचंड कौतुक झालं असतं. आपल्या देशातही काही लोक आहेत, जे तुमची पाठ थोपटणार नाहीत. पण, मी तुमचा जय जयकार करत राहणार आहे. गावांना आणि गावातील लोकांना संभाळणा-यांना मी नमन करतो,”- नरेंद्र मोदी.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.