लवकर बऱ्या व्हा, बाकीचं आम्ही बघतो राज ठाकरेंनी कल्पिता पिंपळेंना दिला शब्द

राज ठाकरेंनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली

लवकर बऱ्या व्हा, बाकीचं आम्ही बघतो राज ठाकरेंनी कल्पिता पिंपळेंना दिला शब्द

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली. ठाण्यातील खासगी रुग्णालयात राज ठाकरेंनी भेट देत कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने सोमवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फेरीवाल्याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राज ठाकरेंचा फेरीवाल्यांना इशारा
ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला होता. “ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत.” असं राज ठाकरे म्हणाले.

नेमक काय आहे प्रकरण?
ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.