घराचे दार उघडताय खरं, पण जरा जपून...

1 min read

घराचे दार उघडताय खरं, पण जरा जपून...

ही घटना आहे अमेरिकेतील ओक्लाहोम शहरात राहणारया जेरेल हेवुड नावाच्या व्यक्तिची. त्याने स्वप्नात सुद्धा याबद्दल कल्पना केली नव्हती की, त्याच्यासोबत असा जीवावर बेतनारा प्रकार घडेल.

घराचे दार उघडत असताना कोणताही व्यक्ति कल्पना करू शकणार नाही की, आपल्या सोबत काही विपरीत घडेल. परंतु अमेरिकेत एका व्यक्ति सोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. ज्यामुळे कोणालाही आश्चर्यच वाटेल.

ही घटना आहे अमेरिकेतील ओक्लाहोम शहरात राहणारया जेरेल हेवुड नावाच्या व्यक्तिची. त्याने स्वप्नात सुद्धा याबद्दल कल्पना केली नव्हती की, त्याच्यासोबत असा जीवावर बेतनारा प्रकार घडेल. त्याने जसे आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला त्याच क्षणी लाईटवर असलेल्या सापाने त्याच्या चेहरयावर दंश मारला. परंतु सुदेवाने त्याचे प्राण वाचले. ज्यावेळी त्याच्यासोबत ही घटना घडली तेव्हा त्याने तत्काळ आपल्या मिञांना कळवले त्यांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. तेव्हा डॅक्टरांनी सांगितले की, हा साप विषारी नसल्याने धोका टळला. सध्या तो पुर्ण बरे होण्यासाठी औषधोपचार घेत आहे.