फिस माफ करून विद्यार्थ्यांना न्याय द्या - भाजपा युवा मोर्चाची मागणी

प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील महामंत्री राहुल लोणीकर यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

फिस माफ करून विद्यार्थ्यांना न्याय द्या - भाजपा युवा मोर्चाची मागणी

जालना : प्रतिनिधी /सुरेश शिंदे : कोरोना महामारीच्या काळात शाळा महाविद्यालय बंद असताना केवळ ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. परंतु महाराष्ट्र सरकारच्या प्रचंड उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारले जात आहे. महाविद्यालय बंद असताना वाचन कक्ष संगणक लॅब प्रयोगशाळा या सर्व सुविधा वापरल्या जात नाहीत तरीदेखील विद्यार्थ्यांकडून या सर्व सुविधांची फीस वसूल केली जात आहे. प्रवेश फी वाचनालय फी देखभाल शुल्क गणवेश यासारख्या एक ना अनेक प्रकारच्या फिस विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने वसूल केल्या जात आहेत. या सर्व विद्यार्थ्यांवर चा मोठा अन्याय असून महाराष्ट्र सरकारला या सर्व बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही.या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, संघटन महामंत्री राहुल लोणीकर यासह आदीनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याकडे केली आहे.

महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या परीक्षेचे साठी विद्यार्थ्यांकडून साधारणत ४१५ रुपये इतकी फीस घेण्यात आलेत सुमारे १७ लाख विद्यार्थी संपूर्ण राज्यभरात परीक्षा देणार होते. या सर्व विद्यार्थ्यांची मिळून ६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शासनाच्या तिजोरीत आजही जमा आहे. जर परीक्षा होणार नसेल तर या विद्यार्थ्यांची फिस का परत करण्यात येऊ नये? असा सवाल भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत शासनाची कडे कोणतेही ठोस धोरण किंवा भूमिका आज दिसत नाही १० वी च्या परीक्षा रद्द झाल्या नंतर ११ वी च्या प्रवेशासंदर्भात काय तरतूद करण्यात आले आहे याचे स्पष्टीकरण सरकारकडून होणे गरजेचे आहे ते होताना दिसत नाही प्रत्यक्षात कशाप्रकारे मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला जाईल याची स्पष्टता सरकार करत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यासाठी योग्य असे शैक्षणिक धोरण या काळात राज्य सरकारने राबवणे आवश्यक असल्याचे देखील युवा मोर्चाने निवेदनात म्हटले आहे

तसेच जर परीक्षा होणार नसतील तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणे गरजेचे आहे. परंतु सध्या शाळा किंवा महाविद्यालयात वेगवेगळ्या २० प्रकारच्या फिस आकारल्या जात आहेत प्रत्यक्षात वाचन कक्ष संगणक कक्ष व प्रयोगशाळा मैदान इत्यादी सह शाळेसाठी लागणारी वीज या अनेक बाबी वापरतच नाहीत तर मग विद्यार्थ्यांकडून फीस कशासाठी वसूल केली जात आहे? असा सवाल भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे

शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या या सर्व विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेली परीक्षा फी सह इतर सर्व फीस परत करण्यात याव्यात कोवळी मुळे प्रभावित असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण राज्य सरकारच्या वतीने देण्यात यावे शैक्षणिक फी घेताना टप्प्याटप्प्याने घेण्याची सुविधा करण्यात यावी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे आरोग्य विमा संरक्षणाचे प्रीमियम राज्य शासनाने द्यावे ज्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्याच शाळा व महाविद्यालयात संबंधित विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राची राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना दिले आहे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.