सोने चांदीच्या दरात घसरण

सोन्याच्या दरात १६०० रुपयांची तर चांदीच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली आहे

सोने चांदीच्या दरात घसरण

मुबंईः सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर होळीच्या आधी सोनाच्या दरात घसरन झाल्याचे दिसते.सोन्याच्या दरात १६०० रुपयांची तर चांदीच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली आहे. अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणे हा सुरक्षित आणि हमी देणारा असा गुंतवणुकीचा पर्याय. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्याने होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अलिकडच्या काळात सोन्याच्या दरात झालेली घसरण पाहता येत्या काळातही थोड्याफार प्रमाणात दर घटण्याचे हे सत्र असेच सुरु राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे पहायला मिळतेय. मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात १६०० रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाल्याचे पहायला मिळाले. मुंबई आणि पुण्यात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ४३,७६० रुपये इतका आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ४४, ७६० रुपये इतका आहे. तर चांदीच्या दरात ७०० रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीसाठी आता ६५.००० रुपये मोजावे लागणार आहेत. शुक्रवारी हा दर ६५,७०० इतका होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.