न्यायालयांची चांगली पायाभूत सुविधा ही केवळ कल्पना -एन व्ही रामण्णा

न्यायालयांची चांगली पायाभूत सुविधा ही केवळ कल्पना -एन व्ही रामण्णा

औरंगाबाद- देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या बी आणि सी विंग या इमारत उद्‍घाटन कार्यक्रमाला उपस्थितीत होते. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरण रिजीजू उपस्थित होते.

सरन्यायाधिश एन व्ही रमण्णा यांनी न्यायालयांच्या पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.ते म्हणाले की,भारताची ही मानसिकता आहे की जीर्ण इमारतींमध्ये न्यायालये चालवली जातात.हि मानसिकता बदलायला हवी असे रमण्णा यांनी सांगितले. न्यायिक पायाभूत सुविधांसाठी प्रस्ताव पाठवला राष्ट्रीय न्यायिक पायाभूत सुविधा प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी सरन्यायाधीशांकडून प्रस्ताव विधी व न्याय मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले संसदेच्या आगामी अधिवेशात हा मुद्या उपस्थित करुन तातडीने ठराव करण्याची विनंती मी विधी व न्याय मंत्र्यांना करतो असेही सरन्यायाधीश एन.व्ही रमण्णा यांनी म्हटंल आहे.

किरण रिजुजू काय म्हणाले?
आपली न्याय व्यवस्था खूप तणावात काम करतोय, त्यामुळं एकदा ही सगळी व्यवस्था समजून घेतली की काम करणे सोपं होईल. मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ हजार कोटी, न्यायपालिकेतील बदलासंदर्भातील प्रस्ताव ठेवला आहे. गरजूंना लीगल सर्विसेस वाईट नको तर त्या दर्जेदार मिळायला हव्यात याबाबत आम्ही बंधिल आहोत. अगदी जम्मू काश्मीर वा कुठलाही सीमा भाग सगळीकडे चांगली सेवा देण्याचे आमचे ध्येय आहे. मी या खात्याचा मंत्री झाल्यावर पहिल्यादा सुप्रीम कोर्ट जवळून पाहिले तिथला फाइल्सचा ढिगारा पहिला आणी थक्क झालो.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.