औरंगाबाद महापालिकेकडून खेळाडूंसाठी खुश खबर..!

1 min read

औरंगाबाद महापालिकेकडून खेळाडूंसाठी खुश खबर..!

औरंगाबाद महापालिकेने अनलॉक प्रक्रियेत शहरातील मैदानांना उघडण्यास परवानगी दिली आहे.

वैष्णवी दंडुके/औरंगाबाद.दि.२० : महापालिकेने अनलॉक प्रक्रियेत शहरातील  मैदानांना उघडण्यास परवानगी दिली आहे. शहरातील मैदाने खेळाडूंना सराव करण्यासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  क्रिकेट, खो-खो यांसारख्या खेळांसह इंडोर खेळ खेळण्यास परवनगी दिली जाणार आहे.

खेळाडूंनी सुरक्षित अंतर ठेऊन मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. १० वर्षाखालील आणि ६५ वर्षाच्या वरील व्यक्तींना मैदानावर जाण्यास बंदी असेल.  कोरोना चा प्रभाव कमी होत असल्यामुळे मैदाने खुली करण्याचा निर्णय मनपाकडून घेण्यात आला आहे. सोमवार पासून मैदानावर गर्दी न होऊ देता खेळाडूंना क्रिकेट , खो-खो , बॅडमिंटन , लॉन टेनिस या इंडोर खेळास परवानगी असली तरी क्रीडा स्पर्धा , खेळाचे उपक्रम ,संमेलन घेण्यास बंदी असेल.

'या नियमांचे करावे लागणार पालन'

मैदानावर फिजिकल डिस्टंसीग .

सरावासाठी आवश्यक तेवड्याचं खेळाडूंना प्रवेश .

मास्क चा वापर आवश्य्क.

कोविड ची लक्षणे असल्यास खेळाडूला प्रवेश निषेध.

खेळाडूंची रोज नोंद