गुड न्यूज:पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त,मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय

मोदी सरकार 15 मार्चपर्यंत तेलावरील कर कमी करण्याची तयारी करीत आहे. यासाठी राज्ये,तेल कंपन्या आणि मंत्रालय या संदर्भात वाटाघाटी सुरू आहे.केंद्र-राज्यांनी समन्वय ठेवून प्रयत्न केले पाहिजेत- आरबीआय गव्हर्नर

गुड न्यूज:पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त,मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय

नवी दिल्ली: देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. काही राज्यांत तर पेट्रोलनी शंभरी पार केलं आहे. सामान्य जनता वाढत्या महागाईंनी त्रस्त आहे. परंतु जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार करीत आहे. अधिक माहितीनुसार तेलावरील कर कमी करण्याचा निर्णय 15 मार्चपर्यंत सरकार घेणार आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार आहेत. यासाठी राज्ये,तेल कंपन्या आणि मंत्रालय या संदर्भात वाटाघाटी करत आहेत. यासाठी तेल कंपन्यांची संमती मिळणे अपेक्षित आहे.

जनता महागाईने त्रस्त
काही राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या वर जाऊन पोहचली आहे. याच महागाईचा जनता आणि विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध सुरू आहे. इंधनाचे दर सतत वाढत असल्याने वाहतुकीचा खर्चही वाढत आहे. त्याचा भाजीपाल्याच्या किंमतींसह इतरही अनेक गोष्टींवर परिणाम होत आहे. सामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींचे कारण सरकार सांगत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ. गेल्या 10 महिन्यांत कच्च्या तेलाची किंमत जवळजवळ दुप्पट झाली आहे. देशात तेलावर असलेला कर किंवा उत्पादन शुल्क (एक्साइज) हे सुमारे 60 टक्के आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्यावरचा कर कमी केल्यास जनतेला दिलासा मिळणार आहे.

केंद्र-राज्यांनी समन्वय ठेवून प्रयत्न केले पाहिजेत- आरबीआय गव्हर्नर
इंधनाचे दर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. दर कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित पावले उचलली पाहिजेत. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शक्तिकांत दास बोलत होते.

तेलावर आहे जास्त कर
भारत हा जगातील तिसरा मोठा तेलाची बाजारपेठ असलेला देश आहे. देशाच्या विकासासाठी भारत कच्च्या तेलावर अवलंबून आहे. भारत दरवर्षी सुमारे 2116 लाख टन तेल वापरतो. त्यापैकी 350 लाख टनांपेक्षा कमी तेल उत्पादन देशात होते. भारताकडे पुरेसा तेल साठा नाही. भारत सुमारे 85 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. हेच इंधनाच्या किंमती वाढीमागील प्रमुख कारण आहे. तेल उत्पादक देशांनी पुरवठा कमी केला आहे, परंतु मागणी वाढतच आहे. भारतात तेलावर 260 टक्के कर लावला जातो. यामुळे इंधनाचे दर वाढतच आहेत.

कॉग्रेस प्रवक्तांच्या भावावर बलात्काराचा गुन्हा
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वनमंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावर झालेले अत्याचाराचे आरोप आणि आता कॉग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.