1 जून पासून बदलणार Google आणि YouTube ची पॉलीसी, सेवांमध्ये होणार मोठे बदल

१ जूनपासून Google Photos, Youtube सेवांमध्ये होणार बदल

1 जून पासून बदलणार Google आणि YouTube ची पॉलीसी, सेवांमध्ये होणार मोठे बदल

नवी दिल्ली: येत्या १ जून पासून टेक्नॉलॉजीच्या जगात महत्वाचे होणार आहेत. यामध्ये  Google आणि Youtube चा देखील समावेश आहे. त्यामुळे युजर्सला जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे. १ जून पासून काय बदल होणार आहेत, ते जाणून घेऊया.

१ जूनपासून Google Photos या मोफत सर्विससाठी मोजावे लागणार शुल्क

१ जूनपासून गुगलकडून मोठा बदल करण्यात येणार आहे. Google Photos या मोफत सर्विससाठी शुल्क मोजावे लागणार आहे. गुगल फोटोमध्ये १ जूनपासून अनलिमिटेड फोटो अपलोड करता येणार नाही. कंपनी या सुविधेसाठी आता पेड सब्सक्रिप्शन मॉडेल घेऊन येणार आहे. कंपनीकडून त्याला Google One असे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच आता गुगल कडून गुगल फोटो क्लाउड स्टोरेजसाठी पैसे आकारले जाणार आहेत. सध्या यासाठी कोणतेही शुल्क युजर्सकडून आकारले जात नव्हते. गुगल नुसार आता प्रत्येक जीमेल यूजर्सला १५ जीबी स्पेस दिली जाईल. या स्पेसमध्ये जीमेलच्या ईमेल्ससोबत फोटोचा देखील समावेश आहे. यात गुगल ड्राइव्हवर फोटोज, व्हिडीओ आणि अन्य फाइल्सचा समावेश आहे. १५ जीबी पेक्षा अधिक स्पेस हवी असल्यास Google One सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल १५ जीबी पेक्षा अधिक फोटो आणि डॉक्युमेंट ऑनलाईन स्टोर केल्यास युजर्सला प्रतिमहिना १.९९ डॉलर (१४४ रुपये) आणि याचे वार्षिक सब्सक्रिप्शन १९.९९ डॉलर म्हणजे (१४४८ रुपये) द्यावे लागणार आहेत.

YouTube च्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांना सुद्धा आता भरावा लागणार कर

YouTube च्या माध्यमातून कमाई करणे आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र आता १ जून पासून YouTube वरून मिळणाऱ्या कमाईवर कर द्यावा लागणार आहे. या नियमांनुसार YouTube च्या अमेरिकेतील कंटेट क्रिएटर्सकडून कर घेतला जाणार नाही, परंतु भारतासह जगातील अन्य ठिकाणच्या कंटेट क्रिएटर्सना YouTube च्या कमाईवर कर भरावा लागणार आहे. YouTube च्या या नव्या कर प्रणालीची सुरुवात जून २०२१ पासून सुरु होणार आहे. यानुसार फक्त तुम्हाला अमेरिकेतील viewers कडून मिळालेल्या views साठीचा कर द्यावा लागणार आहे. या कर प्रणालीमध्ये भारतीय युट्युब कंटेट क्रिएटर्सचा देखील  समावेश असणार आहे. त्यांना कमाईच्या २४ टक्के प्रतिमहिना अशा हिशोबाने कर द्यावा लागणार आहे. YouTube कंटेट क्रिएटर्सना नव्या नियमाअंतर्गत आपली कमाई ३१ मे पूर्वी सांगावी लागणार आहे. अशातच गुगलकडून युट्युब कंटेट क्रिएटर्स कडून १५ टक्के हिशोबाने कर वसूल केला जाणार आहे. तसेच ३१ मे पर्यंत कमाईचा खुलासा न केल्यास कंपनी युजर्सकडून २४ टक्के कर घेणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.