अजिंठा लेणीत दोन बिबट्यांचे दर्शन

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद...

अजिंठा लेणीत दोन बिबट्यांचे दर्शन

औरंगाबाद : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमध्ये दोन बिबट्यांनी भल्या पहाटे दर्शन दिले. ही घटना येथील सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आणि बिबटे फिरत असल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. व्हायरल व्हिडियोमधील पहिल्या व्हिडियोमध्ये एक बिबट्या लेण्यांच्या भागात फिरताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडियोत दोन बिबटे इकडून तिकडे उडी मारत आहे.

सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या

ही घटना शुक्रवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेदरम्यान घडली आहे. संबंधित घटनेसंदर्भात वनविभागाला कळवले गेले असून हे व्हिडियो नुकतेच व्हायरल झाले आहे. अजिंठाच्या जंगलात वाघ, बिबटे, अस्वल, माकडे मोठ्या प्रमाणात वास्तव करतात. परंतु, यातील वाघ आणि बिबटे लेण्यांच्या दर्शनी भागात शक्यतो आढळून येत नाही. यामुळे आतापर्यंत कोणालाच इजा पोहोचली नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.