गोवा पर्यटकांसाठी खुलं

1 min read

गोवा पर्यटकांसाठी खुलं

सरकारी नियमांच पालन कराव लागणार

गोवा: कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरांमध्ये बंद आहेत. देशात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा 5 वा टप्पा सुरु असून देशात जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशातच देशात लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असून पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या गोव्यातही 2 जुलैपासून पर्यटन सुरु करण्यात आलं आहे. विदेशातील पर्यटकांना मात्र अद्याप गोव्यात येता येणार नाही. असा निर्णय गोवा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी यांची घोषणा केली. राज्य सरकारनं जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या 250 हॉटेल्सला पर्यटन विभागाकडून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सध्या देशातील पर्यटकांना गोव्यातील पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशातील पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली नाही. देशातील पर्यटकांसाठी नियमावालीही निश्चित करण्यात आली आहे. गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचं हॉटेलमधील राहण्याचं बुकिंग अगोदरच करावं लागणार आहे. त्यानंतर ते पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल. त्याचबरोबर पर्यटकांना गोव्यात दाखल होताना करोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. तसेच प्रमाणपत्र नसल्यास अशा पर्यटकांची चाचणी सीमेवरच चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत राज्य सरकारच्या वतीने त्यांना क्वॉरंटाईन ठेवलं जाईल. ज्या पर्यटकांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी दिली जाईल अथवा गोव्यातच उपचार घेण्याचा पर्यायही दिल्या जाईल.

India_-Goa-010-_Touristy_Baga_Beach

कोरोना नंतर पुन्हा एकादा देशातील आकर्षणाच केंद्र असलेलं गोवा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पण काही सरकारी नियमांच पालन करणे पर्यटकांना बंधनकारक असणार आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर पर्यटकांना आपल्या राज्यातच उपचार घेण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच गोव्यात देखील उपचार करता येईल असे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले आहे.
आरोग्य तपासणी गरजेचीच

जर एखादी व्यक्ती बाहेरून गोव्यात येत असेल तर संबंधित व्यक्तीने 48 तासात आरोग्य तपासणी केलेली आसावी. नसेल तर आरोग्य तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. तसेच संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी होत नाही तोपर्यंत तिला क्वॉरंटाईन राहावे लागेल. तिचा कोरोना अहवाल निगोटीव्ह आल्यास तिला पर्यटन करण्याची परवानागी दिली जाईल. असे पर्यटनमंत्री म्हणाले.

2491393315_a336e2eec8_b