सरकार आपल्या पाठीशी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

1 min read

सरकार आपल्या पाठीशी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. हे सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे.

सुमित दंडुके / उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 ऑक्टोबर रोजी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान काटगाव, ता.तुळजापूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. हे सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल. सरकार मंत्रिमंडळ बैठकीत माझ्या शेतकरी बांधवांच्या मदतीबाबतचा निर्णय घेण्यात येईल, शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभं करण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काटगाव येथील शेतकरी बांधवांना दिली.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील घाडगे, ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी-कर्मचारी, शेतकरी बांधव व काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते.