ग्रामीण भागात कोरोनाची भीती शेतात राहण्याशिवाय पर्याय नाही.

1 min read

ग्रामीण भागात कोरोनाची भीती शेतात राहण्याशिवाय पर्याय नाही.

एका बाजुला कोरोनाचा धोका तर दुस-या बाजूला वन्यप्राण्याचा धोका अशा परस्थितीत शेतकरी जगतो आहे.

कोरोनाचा संसर्ग आता ग्रामिण भागात पसरतोय शहरात असलेला कोरोना आता गावखेड्यात दिवसेंदिवस पसरतो आहे. सुरुवातीला जेव्हा सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हा शहरातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं लोक आपआपल्या गावाकडे येऊ लागले कारण तेच गाव सर्वासाठी सुरक्षित होत. सुरूवातीच्या काळात कोरोनाचा प्रसार कमी होता. तरी गावात यायचं असेल तर तपासणी करूनच यावं असा निर्णय गावातील मंडळी ने घेतला जे की सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा होता.
सरकारच्या सुचनेनुसार ग्रामिण भागातील लोक सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आदी नियमांच पालन करत होते. लॉकडाऊनच्या काळात माध्यमातून दिवसभर कोरोनाच्या बातम्या यायच्या लोक त्याबद्दल चर्चा करायचे देशात, राज्यात किती रूग्ण वाढले आपल्या आजूबाजूला कोरोनाचा रूग्ण आहे का? असेल तर ती बातमी त्यांना अस्वस्थ करायची त्यांना भिती वाटायची की आपलं काय होईल. या काळात फेसबुक,Whatsapp च्या माध्यमातून अफवांचा बाजार मांडला होता.
सगळं काही व्यवस्थित सुरू होत एखादी व्यक्ती शहरातून किंवा परदेशातून आली असेल तर क्वारनटाईन केले जायचं, गाव सुरक्षित राहायचं पण आता कोरोना हळूहळू गावात पसरतोय. ग्रामीण भागात समूह संसर्गाचा धोका जास्त असल्यामुळे, या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी गावापासून दूर शेतात राहण्याशिवाय पर्याय नाही. असं लोकांच मत आहे. या कारणाने अनेक लोक, शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात राहायला जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
शेतात राहणे पण सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं आहे. पावसाळा सुरू आहे, शेतात वीजपुरवठा व्यवस्थित असलेच असे नाही. शिवारात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्याचा हरण,डुकर,लांडगा,यांचा मुक्त वावर वाढला आहे, तसेच काही ठिकाणी वाघ, बिबट्या व मगरी दिसल्याचेही निदर्शनास आले आहे, त्यामुळे रात्रीच्या अंधारात शेतात वन्यप्राण्याचा शेतक-यांवर कधीही हल्ला होऊ शकतो. अंधारात राहाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे ठरु शकते. एका बाजुला कोरोनाचा धोका तर दुस-या बाजूला वन्यप्राण्याचा धोका अशा परस्थितीत शेतकरी जगतो आहे.