ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विकासकामात गैरप्रकार

1 min read

ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विकासकामात गैरप्रकार

ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

सिध्देश्वर गिरी/परभणी: पाथरी तालुक्यातील बानेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत पथदिवे व पाणी पुरवठ्याच्या विकासकामात गैरप्रकार झाला असून सदरील कामाची माहिती देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करत आहेत. याप्रकरणी ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी सुरेश घोगरे यांनी केली आहे. सुरेश रामेश्वर घोगरे यांनी गटविकास अधिकारी पाथरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की,पाथरी तालुक्यातील मौजे बानेगाव येथे सन २०१६ ते २०२० या दरम्यान विविध योजनेअंतर्गत 9 लाख 83 हजार रुपयांचे एल.ई.डीचे पथदिवे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तेव्हा गावातील २२ विद्युत खांबावर किती पथदिवे बसवण्यात आले. त्याची प्रत्येकी किंमत किती आहे? याविषयी माहिती मागितली असता टाळाटाळ करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे पाणीपुरवठ्याविषयीही कायदेशीर माहिती मागवली असता ग्रामसेवक टाळाटाळ करत आहे. पथदिवे व पाणी पुरवठ्याच्या कामात गैरप्रकार करण्यात आल्याचे यावरून सिद्ध होते. याप्रकरणी ग्रामसेवक खोटी माहीती देऊन दिशाभूल करत आहेत.या विकासकामात गैरप्रकार करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.