सुमित दंडुके / औरंगाबाद : सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र अनेक पिकांचे नुकसान होत आहे. परिसरात पडत असलेल्या पावसामुळे झेंडुच्या फुलांचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. रविवार रोजी दसरा सण येऊन ठेपला असल्याने दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मागणी अधिक असते मात्र पावसाने झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले असल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता - तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला असल्याचे दिसत आहे .
दसऱ्याला झेंडूच्या फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होत असते. मात्र यावेळी झेंडूच्या फुलांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.
झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या मते " यंदा झेंडूचे फुले चांगले आले होते मात्र दोन - तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने झेंडूचे झाडे वाकली असून पावसाने फुले ही सडत आहेत.
दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडु फुलांचे मोठे नुकसान
दसरा सण येऊन ठेपला असल्याने दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मागणी अधिक असते मात्र पावसाने झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले असल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता - तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला असल्याचे दिसत आहे .

Loading...