पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्री नवाब मलिक यांचा आज परभणी अतिवृष्टी पाहणी दौरा

1 min read

पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्री नवाब मलिक यांचा आज परभणी अतिवृष्टी पाहणी दौरा

विरोधी पक्षाने परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी दौरा करुन शासनाची सत्ताधाऱ्यांची कानउघाडणी केली.

परभणी/सिध्देश्वर गिरी : परभणी जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारे सोयाबीन आणि कापूस हे पीक गेल्यानंतर अवकाळी पावसाच्या सरीही बरसल्या असल्याने या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना उघड्यावर आणले आहे.यात परभणी जिल्ह्यात सुपीक जमिनीचा प्रकार मोठ्या प्रमाणात असल्याने व येथील पिकांना बसलेल्या फटक्यामुळे विरोधी पक्षाने या जिल्ह्यात अतिवृष्टी दौरा करुन शासनाची सत्ताधाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.


यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आ.मेघना बोर्डीकर,रासपाचे आ.डाँ.रत्नाकर गुट्टे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी परभणी जिल्ह्याचा अतिवृष्टी दौरा करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी लावून धरली होती.यामुळे पंचनामे होतील आणि मदत मिळेल असे वाटत असतानाच अद्यापही नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.यातच सत्ताधारी पक्ष हवेत असल्याच्या वल्गनाही चर्चेद्वारे व्यक्त केल्या जात आहेत.त्यामुळेच परभणी जिल्ह्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी यायला पाहिजे होते.अशी चर्चाही होत असून सत्तेत नसताना सत्ताधारी पक्षातील या नेत्यांना परभणी जिल्हा आवडतो.


मात्र सत्तेत आल्यास परभणी जिल्ह्याला सावत्रपणाची वागणूक दिल्या जात असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.अशी चर्चाही ग्रामीण भागात होत असल्याने पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्र्यांना उशिरा जाग आल्याचे दिसून येत आहे.आज पालकमंत्री नवाब मलिक हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.