सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व खरीप पेरणी पूर्व नियोजनाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रिलायन्स फाऊंडेशन व कृषी विज्ञान केंद्र परभणी यांचा उपक्रम

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व खरीप पेरणी पूर्व नियोजनाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

विजय कुलकर्णी/परभणी: दर वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात जवळ जवळ एक आठवडा अगोदर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सद्या आनंदाचे वातावरण आहे. परंतु लवकर पाऊस चालू झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची उन्हाळी मशागत बऱ्यापैकी बाकी आहे. आणि त्यातच सोयाबीनच्या काही जातीच्या बियाणाचा परभणी जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे, अशावेळी शेतकऱ्यांनी नेमके काय करावे जेणे करून या दोन्ही समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन व कृषी विज्ञान केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व खरीप पिकांचे नियोजन या विषयावर व्हाट्सअप ग्रुप द्वारे मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सुमारे ३५ ते ४० शेतकरी एकाच वेळी फोनद्वारे जोडले गेले होते या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कछवे सर (विषय:विशेषज्ञ कृषिविध्या) वसंतराव नाईक मराठवाडा, कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र डॉ. भालेराव सर, डॉ. अमोल काकडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या वेळी त्यांनी सोयाबीन लागवडीसाठी बाजारात जर बियाणे भेटत नसेल तर शेतकरी बांधवांनी घरघुती बियाणे पेरावे असे सागितले.

परंतु पेरणी करण्यापूर्वी बियाणाची उगवण क्षमता तपासावी तसेच बियाणाला बुरशी नाशकाची व जिवाणू खतांची बीज प्रक्रिया करावी आणि पेरणी साठी शेतकऱ्यांनी घाई करू नये ७५ ते ८० मिलिमीटर पाऊस पडल्या नंतरच व पावसाचा अंदाज पाहूनच पेरणी करावी व शक्य असल्यास बिबियफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी करावी जेणेकरून सोयाबीनच्या उत्पादनामध्ये २० ते २५ ट्टके वाढ होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच कापूस ,तूर,बाजरी,मूग या पिकांना ही पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करावी असे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशन चे जिल्हा व्यवस्थापक दिपक केकान व कार्यक्रम सहायक व रामजी राऊत यांनी केले होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.