ऑडियो कॉन्फरन्सद्वारे शेतक-यांना मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व रिलायंस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने

ऑडियो कॉन्फरन्सद्वारे शेतक-यांना मार्गदर्शन

परभणी : सध्या खरीप हंगामातील पीक हे जोमाने वाढत आहे. त्यातच सोयाबीन कापूस पिकांमध्ये विविध कीड व रोग यांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन कापूस पिकांमध्ये किडी व रोग यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे रिलायन्स फाऊंडेशन व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सद्यपरिस्थितितील पीक व्यवस्थापन तसेच कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर ऑडिओ कॉन्फरन्स चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये परभणी जिल्ह्यातील साटला येथील कापूस, तूर व सोयाबीन उत्पादक शेतकरी समाविष्ट होते.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ जी डी गडदे, विस्तार कृषी विद्यावेता तथा व्यवस्थापक, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि परभणी व डॉ.डी.डी.पटाईत, किटकशास्त्रज्ञ हे उपस्थित होते. सद्यपरिस्थिती मध्ये कापूस, सोयाबीन पिकांमध्ये येणारा पिवळेपणा, बुरशीजन्य रोग, तसेच मावा, चक्रीभुंगा, खोडमाशी, पैसा (वाणी) इत्यादी कीडी व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कापूस सोयाबीन पिकांमध्ये साचलेले जास्तीचे पाणी निचरा करावा, तसेच अन्नद्रव्याची पूर्तता वेळेवर करावी असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले. रिलायन्स फाउंडेशनकडून शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधीत विविध समस्या वेळोवेळी अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करून सोडवल्या जातात यामुळे शेतकरी अशा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. या कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशन चे जिल्हा व्यवस्थापक दिपक केकान व कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.