गुंग करून बुडवली मजुरी

1 min read

गुंग करून बुडवली मजुरी

तेविस मजूरांना जेवणातून गुंगीचे औषध देवून चार मशीन मालक आपली मशीन घेवून फरार.

निटूर : निटूर परीसरात राजस्थान येथील सोयाबीनच्या राशी करणाऱ्या मशीन मजूरासह गेल्या दिड महीन्यापासून राशी करत फिरत आहेत. परीसरात अंदाजे दहा मशीन आणि पन्नास मजूर या मशीनवर काम करत आहेत. सर्व मशीन राजस्थान च्या तर सर्व मजूर मध्यप्रदेश चे आहेत, माञ चार मशीनवर काम करणाऱ्या तेविस मजूरांना जेवणातून गुंगीचे औषध देवून चार मशीन मालक आपली मशीन घेवून फरार झाले आहेत.
दिड महीन्यापासून काम करत असल्याने या तेविस मजूराचे तीन ते चार लाख रूपये संबंधित मशीन मालकाने न देता पोबारा केला.
आपली फसवणुक झाल्याचे कळताच हे सर्व मजूर निटूर पोलिस चौकीमध्ये आले व त्यांनी सर्व हकीकत निटूर पोलिसांना सांगितली. त्यावरून निटूर पोलिसांनी परीसरातील सर्व राजस्थानी मशीन पोलिस चौकीत लावल्या आहेत, व पळून गेलेल्या मशीन मालकांची चौकशी करत आहेत.
या तेविस मजूराकडे एक छदामही नसल्यामुळे निटूर पोलिसांनी दोन दिवस त्यांची व्यवस्था केली. त्यानंतर ग्रामदैवत सादनाथ महाराज मंदीर निटूर समितीच्या वतीने पंकज कुलकर्णी , अनिल पाटील, बाळू डांगे यांनी सर्व मजूरांची जेवणाची व्यवस्था केली
सदरील फरार मशीन मालकांचा शोध निटूर पोलिस घेत आहेत .