हम कथा सुनाते राम सकल गुणगान की

रामचरित्रावर नको नको ते आक्षेप घेऊन उगाच वाद करणा-यांना उत्तर देण्यासाठी हा लेख नक्की वाचा आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे नक्कीच मिळतील

हम कथा सुनाते राम सकल गुणगान की

राम
रामायण ही तीन बंधू समुहाची कथा आहे. एक मानव जे अयोध्येचे राज्य एकमेकाला द्यायला उत्सुक आहेत. त्यांना राज्याचा मोह नाही. गादीवर भरत बसला तरी रामाला त्याचे वाईट वाटत नाही. तर भरताला आपला भाऊ वनात असताना राज्यसुख भोगणे योग्य वाटत नाही. दुसरा समुह किश्केंधेचा, प्राणी समुहातील. आपल्या भावाचे राज्य आणि बायको वाली बळकावतो. पित्याची ईच्छा न माणता राज्याची वाटणी करत नाही. जे हाती लागलं ते माझंच असे म्हणण्याची ही वृत्ती तिसरा बंधू समूह लंकेतील दानवांचा, जिथे बळाच्या आणि शक्तीच्या जोरावर एक भाऊ सर्वश्रेष्ठ ठरतो आणि आपल्या अन्य भावाला गुलाम समजतो. हा देखील स्त्रीयांच्या मोहात पडतो.
यातील अयोध्येच कुळ सोडलं तर एकालाही आपलं राज्य अथवा प्रजा यांच्याशी कसलही सोयरसुतक नाही. त्यांना पालनकर्ता व्हायचं नाही तर, स्वामी व्हायचं आहे. राज्य चालवायचं नाही तर उपभोगायचं आहे.
रामायणात नियम कितीही अप्रीय असले तरी त्याचे पालन करणे सक्तीचे माणणारा मर्यादा पुरूषोत्तम या कथेचा नायक आहे. रामायणाचा मुळ रचियता वाल्मिकी असल्याची श्रध्दा आणि विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे. तर ख्रिस्तपूर्व काळ 500 बीसीई पासून रामायण मोखीक पध्दतीने पुढे आले आहे. मुळ रामायण संस्कृतमध्ये याचे लिखीत स्वरूप लवकर आलेच नाही. ज्ञानी ऋषी अथवा कवींनी मुखोद्गत करून रामायण पुढच्या पिढीला सांगितले रामायणाची कथा उत्तर भारताकडून दक्षीण भारताकडे घडत आली आहे. त्यामुळे या कथा वेवेगळ्या स्वरूपात दोन्ही भागामध्ये सांगितल्या गेल्या. तिथे वेगवेगळ्या लेखकांनी त्या लिहिल्या. विलक्षण काव्याचे आकर्षन सगळ्यांनाच होते. त्यामुळे रचनादेखील खुप झाल्या आणि स्थानिक संदर्भ त्यात येत गेले. अकबर बादशहाने ही कथा पर्शीयन भाषेत अनुवादीत करून घेतली. थायलंड किंवा ईंडोनिशिया मध्येही रामकथा आढळते. एमराल्ड बुध्द मंदिरात रामाची चित्र दिसतात. तर थायलंडची राजधानी आयुथया ( अयोध्या) असल्याचे दिसते. एवढच काय थायलंड च्या राजाला रामा म्हटलं जातं. एकुणच रामकथा आशिया खंडात सगळीकडे पोहचली होती. पण मुळ वाल्मिकी रामायणातील कथा संस्कृतमध्ये असल्यामुळे समजण्यास कठीण वाटणारी ही भाषा मुळ रामकथा अभ्यासक वर्गापर्यंत पोहचलीच नाही. राज्यकर्ते बदलत गेले भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या धर्माचे राज्यकर्ते आले. त्यांनी आपल्या सोयीने रामायणाचे भाषांतर करून घेतले. हेच भाषांतर भारतातील अभ्यासकांनी वाचले. परदेशात जाऊन शिक्षण घेतलेल्या भारतीय अभ्यासकांनी मुळ वाल्मिकी रामायण वाचण्या ऐवजी ईंग्रजीतील भाषांतरीत रामायण वाचून आपले मत बनविले आणि हेच अभ्यासंकांचे मत रामचरित्राला चिकटले.
वाल्मिकी रामायणातील कथा देखील मौखीक परंपरेने पुढे आल्याने आपल्याला आवडलेली आपल्या आराध्याची कथा अधीक रंजक व चमत्कारांची भर घालत नैसर्गिक रित्या पुढे सरकत गेली. चमत्कार, रंजन श्रध्दा यातून पुढे सरकत आलेली कथा अनेक भर पडत विस्तारत गेली. म्हणूनच तर कौशल्याला चमत्काराचे स्वरूप दिले.
रामाच्या चरित्रावर सर्वात पहिला आक्षेप घेतला जातो तो म्हणजे स्वतः वनवासाला निघत असताना त्याने सीता आणि लक्ष्मणाला या दुःखात का खेचले. वाल्मिकी रामायणात रामाने सीता आणि लक्ष्मणाचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्याचे वाचायला मिळते. सीता व लक्ष्मणाने वनात येऊ नये अशी रामाची ईच्छा असते. मुळात असे आक्षेप व्यक्त करताना मुळ वाल्मिकी रामायणाचे वाचन झालेले नसते किंवा ते जाणिवपूर्वक केल्याचे दिसत नाही.
वालीवर लपून वार करणारा राम न्याय मर्यादांचे उल्लंघन करतो. असाही आक्षेप तथाकथीत पुरोगामी घेतात. खर तर न्याय ही नागर संकल्पना आहे वन्य नाही. मानवी रक्ताला चटावलेला हिंस्त्र प्राणी जेंव्हा नागरीवस्तीत आक्रमण करत असतो तेंव्हा बकरीचे आमिष दाखवून त्याला पिंज-यात बंद करण्याची अथवा त्याची शिकार करण्याची पध्दत आपल्याकडे आहेच की.
वाली आपल्यातील बळाचा वापर करत सुग्रीवाची पत्नी आणी त्याचे राज्य हरण करत होता. आपल्या बळाच्या जोरावर वनजीवांना त्रास देत होता. त्याला जेरबंद करणे किंवा संपविणे आवश्यक होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुग्रीवाची आणि रामाची भेट झाल्यावर सुग्रीवाने आपली अडचण रामाला सांगितली आणि मदत करण्याची विनंती केली. सुग्रिवानेच रामाला लपून बाण मारून वालीस मारण्याविषयी सांगितले. सुग्रीव त्यावेळी वाली सोबत युध्द करेल असेही सांगितले. यावेळी रामाने तोच प्रश्न विचारला होता, “मी सरळ वालीला युध्दात मारू शकतो मग लपून वार का?” तेव्हा सुग्रिवाने जे सांगितले तेच या आक्षेपाचे उत्तर असेल.
सुग्रीव म्हणाला,“ रामा, तू वालीला मारलं तर या वन्य जिवांच्या लेखी तू बलशाली ठरशील आणि ते तुला आपला प्रमुख माणतील. तू माझा सहायक नाही तर त्राता ठरशील. जो पर्यंत मी वाली सोबत द्वंद्व करणार नाही तो पर्यंत माझं वानर सैन्य मला बलशाली समजणार नाही ” हे देखील खरच होतं सुग्रिवाची ही अडचण रामाने ओळखली आणि वालीचा लपून वध करण्याचे मान्य केले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे रामासाठी हा करार होता. सुग्रिवाची मदत घेऊन पुढे सीताशोध आणि मुक्तता करायची होती. त्यासाठी सुग्रिवाला त्याचे राज्य व पत्नी परत मिळवून देऊन अत्याचारी भावापासून त्याला मुक्ती द्यायची होती. या आक्षेपाच्या उत्तरात एकच वाक्य सतत डोळ्यासमोर राहतं ते म्हणजे, “न्याय ही नागर संकल्पना आहे वन्य नाही.”
रामसेतू हा कांही चमत्काराचा भाग बनून वाल्मिकी रामायणात येत नाही. नल हा विश्वकर्माच्या कुळातला तो स्थापत्य कला निपून असला पाहिजे. लक्षात घेतले पाहिजे की राम हनुमान किंवा अन्य कोणी आपल्या दैवी चमत्काराच्या जोरावर लंकेत पोहचले असा उल्लेख वाल्मिकी रामायणात कोठेही नाही. मानवी मर्यादांच्या पालन होतच रामाचा पूर्ण जीवनप्रवास वाल्मिकी रामायणात दाखवला आहे. खरतर मानवी मर्यादा आणि नियमांचे पालन हेच रामचरित्र आहे. ही कथा हजारो वर्ष पूर्वी घडली आहे. त्यावेळी सेतू निर्माण हा विषय खरोखरच एक नवलाईचा विषय असणे शक्य आहे. नल आणि निल यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर हा सेतू उभा केला. पुढे या कथांमध्ये लालित्य भरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रीलंकन सामुद्रधुनीत एक भिंत दिसते त्याला युरोपियन समुदाय एडम्स वॉल असं म्हणतो. रामेश्वर जवळच धनुष्यकोडी ते श्रीलंकेतील मन्नार बेट या दरम्यान ही भिंत आहे.
अग्नीपरीक्षा होय सीतेसाठी अग्नीपरीक्षाच ती. रामाच्या अत्यंत विश्वासाच्या आणि सशक्त संरक्षणातून हरण केली गेली होती फसवून पळवली गेली होती. एका शक्तीशाली दानवाच्या ताब्यात राहिली होती.
त्याकाळातील सामाजिक वातावरण तसंच होतं. ज्यांचा विश्वास असतो त्याना कोणताही पुरावा लागत नाही. आणि जिथे विश्वास नसतो तिथे सगळे पुरावे नाकारले जातात. सीता तर हजारो वर्षापूर्वी आपल्या पतीच्या संरक्षणातून एका उन्मत्त राक्षसाच्या ताब्यात राहिली होती. तिच्या पतीच्या पुरूषार्थाला ललकारत आणली होती. ज्याच्याशिवाय कांही क्षण देखील राहणे दुरापास्त त्या रामाचा कांही वर्षाचा विरह सितेसाठी एक दाहच होता. ती अग्नीपरीक्षा पूर्ण करून सीता रावणाच्या अंतानंतर रामाच्या भेटीला जात होती. तिला जाणिव होती की रामाचा विश्वास आहेच आपल्यावर पण लोकांचे काय त्यांच्यासाठी तरी ती रामाच्या अपयशाचा प्रतीक होती. आपल्या पतीला आपल्यामुळे लावले जाणारे बोल तिला मनातल्या मनात जाळीत असावेत कदाचित हिच ती अग्नीपरीक्षा.
आजसुध्दा आपण रामायण चोळीमुळे आणि महाभारत साडीमुळे झाल्याचे बोलले जातेच. सीतेसाठी हा लोकापवादाच अग्नीसमान होता. आणि पुढे तिची भीती खरी देखील ठरते. रामाचा विश्वास होता. त्याला पुराव्याची गरज नाही पण लोक त्यांच काय त्यांना कसलाच विश्वास नव्हता.
पुढे रामराज्य सुरू होते. आणि सीता ज्या अग्नीची चिंता करत होती तोच अग्नी तिच्या आयुष्यात वनवा बनून समोर येतो. लोकापवादाचा वनवा. एक सामाण्य माणुस आपल्या बायकोला बोलताना सीतेच्या चारित्र्यावर शंका घेतो. हेच राजा असलेल्या रामाला समजतं आणि नगरात सीता आणि राम यांच्याविषयी चालू असलेली चर्चा देखील लक्षात येते. रस्त्यावर आणि चव्हाट्यावर चाललेल्या गप्पात लोक रामाचा उपहास करत असतात आणि सीतेचा देखील. राम म्हणतो. सीतेचा त्याग करायला हवा. या त्यागामागे तिच्या पातिवृत्याचा किंवा व्यभिचाराचा संबंध नाही. अशा अफवा वा चर्चामुळे प्रजेला आपण राजापेक्षा श्रेष्ठ आहोत असं वाटण्याची संधी मिळते. माझ्या राणीच्या निवडीची ते चेष्टा करत आहेत. ते म्हणतात की राणी शुध्द नाही. पण त्यांना हे कसं सांगायचं की ती शुध्द आहे.
श्रीमंत व्यक्ती आपल्या धनाने अधिपत्य दाखवतात. सामर्थ्य असलेली व्यक्ती आपल्या बळाने आधिपत्य गाजवते. रूपवान व्यक्ती आपल्या सौदर्याने आधिपत्य गाजवते. पण कांहीच नसलेली व्यक्ती आपल्या शुध्दतेच्या संकल्पना अधिपत्यासाठी आणत असते. तसच कांही सितेच्या बाबतीत लोकांनी केलं खरतर राजाला जनादेश पाळायचा असतो. राम हे नियम बदलू शकला असता लोकांवर राजा म्हणून आपले निर्णय ईच्छा लादू शकला असता. पण राम मनमानी करणारा सम्राट नव्हता. ती लोकांची ईच्छा होती आणि काळ हजारो वर्षापूर्वीचा होता. राम मानवी नियमांमध्ये अडकलेला होता. प्रजेला आपण राजापेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटायला लागले तर अधीक धोकादायक स्थिती असते. अशावेळी राजा प्रजेवर आणि राज्यावर नियंत्रण राखू शकत नाही.
या स्थितीत देखील एक गोष्ट वेगळी घडत होती. राम सितेचा त्याग करतो खरा पण अश्वमेध यज्ञाच्यावेळी दुसरा विवाह करावा ही सूचना तो धुडकावून सीतेचा पुतळा करत यज्ञ आरंभ करतो. राजा असलेल्या रामाने सितेचा त्याग केलेला असतो पण पती राम मात्र आपल्या पत्नीला मनात कायम साठवून असतो. राम पुरूषी माणसिकतेचा असता तर आणखी एक विवाह करणे रामाला सहज शक्य असते. पण राम ते करत नाही. सीतेसाठी केलेला संघर्ष आपण विसरतो आणि रामाला आरोपीच्या पिंज-यात उभा करतो.हजारो मैलाचा प्रवास करत अनेक वर्ष वनात वावरत तो सीतेचे मुक्तता करवतो बलाढ्य रावणाशी लढतो.
ram
शोकमग्न राम प्रासादात असतो आणि लक्ष्मण पहारा देत असतो. त्याचवेळी दुर्वास मुनी तेथे येतात दुर्वास खुप तापट मुनी. लक्ष्मण त्यांना विनंती करतो की राम आता खुप दुःखात आहेत त्यांना एकांताची गरज आहे. पण दुर्वास ऋषी भेटण्याचा हट्ट सोडत नाहीत. लक्ष्मण समजून सांगत राहतो. पण दुर्वास चिडतात. आणि लक्ष्मणास म्हणतात तू आता रामाला भेटू दिलं नाहीस तर मी आयोध्या भस्मसात करून टाकीन आणि लक्ष्मण रामाच्या खोलीचे दार उघडतो.
लक्ष्मण रामाची क्षमा मागतो की मी आपला एकांत भग्न केला आहे. मला क्षमा करा. मला आपल्या एकांतापेक्षा आयोध्या भस्मसात होणे बरे वाटले नाही.
तेव्हा राम जे लक्ष्मणास सांगतो ते खुप महत्वाचे आहे आणि सा-या आक्षेपांचे निराकरण करणारे आहे.
“शेवटी तुला समजलं तर लक्ष्मणा!” रामा पेक्षा आयोध्येच महत्व अधीक आहे. माझ्या सर्व कृती आयोध्येसाठी होत्या. पत्नी , मुलगा वडील आई अथवा बंधू या साठी नव्हत्या तर माझ्या प्रजेसाठी होत्या. तुझ्या आणि सीतेच्या सगळ्या कृती माझ्याप्रती असलेल्या प्रेमापोटी होत्या तू माझ्यासाठी एकनिष्ठ होतास सीता माझ्याशी एकनिष्ठ होती. आणि माझं प्रेम आयोध्येच्या लोकांवर त्यांच्या सगळ्या गुणदोषासकट त्यांचा विचार मला करावा लागणार आहेच. हाच राजधर्म असतो


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.