हमी भावापेक्षा कमीने शेतीमालाचा व्यवहार करणा-या व्यापा-यांवर कारवाई करा.

1 min read

हमी भावापेक्षा कमीने शेतीमालाचा व्यवहार करणा-या व्यापा-यांवर कारवाई करा.

विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांचा बाजार समितीच्या सचिवांना आदेश

लातुर कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विभागीय सहनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली लातुर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यातील 49 बाजार समितीच्या सचिवांची बैठक घेण्यात आली. सध्या बाजारात सोयाबीन, तुर, हरभरा हे धान्य हमीभावापेक्षा कमीने खरेदी-विक्री होत आहे. तसेच बाजार समितीत पोटली, पायली, कडत्या सारखे बेकायदेशीर प्रकार ताबडतोब बंद करणे, हमी भावापेक्षा कमीने शेतीमालाचा व्यवहार करणा-या व्यापा-यांवर कारवाई करावी आणि 19 मार्च 2019 च्या परिपत्रकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी दिला. जे कोणी या आदेशाचे पालन करणार नाही त्या सचिवावर कारवाई केली जाईल असेही देशमुख यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक सम्रत जाधव, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, महिला प्रदेशाध्यक्ष विमल आकनगीरे, अनंत दोडके, संजय आपेट, काशिनाथ गडदे, राम मसलगे, बालाजी लव्हे यांची उपस्थिती होती.