नगरपालिकेचा अतिक्रमणावर हातोडा

रस्त्यावरील अतिक्रमण काढत असल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे...

नगरपालिकेचा अतिक्रमणावर हातोडा

निलंगा : शहरातील विविध चौकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. शहरातील पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले होते. शिवाजी चौकातील मुख्य रस्त्यावर दुचाकीच्या पार्कींगमुळे रस्ता व्यापला होता. याचा ञास शहरातील नागरिकांना होत असल्याने अतिक्रमण काढण्याची मागणी होत होती. अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेने रस्त्यावरील फळांचे हातगाडे पान टपरी चहाचे स्टॉल याना नोटीस सुचना दवंडीव्दारे पूर्वकल्पना अनेक महिन्यांपासून देण्यात आली होती. परंतु याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतली,रस्त्यावरील अतिक्रमण काढत असल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

निलंगा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथील शिवाजी नगर मधील येथील अतिक्रमण काढण्यास सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली हे अतिक्रमण काढण्यात येत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनाची गैरसोय दूर होणार आहे. निलंगा नगरपालिकेच्या वतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील नागरिकांना अतिक्रमणाचा नाहक ञास होत होता.अनेक लोकांच्या तक्रारी नगरपालिकाकडे येत होत्या.नगरपालिका सार्वजनिक बांधकाम व पोलिस प्रशासनला या अतिक्रमणाचा ञास होत होता,राजकीय इच्छा शक्ती नसल्याने अतिक्रमण काढण्यास विलंब होत होता.परंतु नागरिकांच्या रेट्यामुळे अतिक्रमण मोहिम राबवावी लागली.

अतिक्रमण काढण्यासाठी पथकाची नेमणूक-मुख्यधिकारी मलिकार्जून पाटील

शहरातील बँक काॕलनी हागडा नाका जिजाऊ चौक आनंदमुनी चौक येथील अतिक्रमण काढण्यासाठी तीन दिवसाची मोहिम राबविण्यात आली आहे.तसेच हि मोहिम राबविण्यासाठी शंभर कर्मचारी नेमण्यात आले आहेत.एक जेसीबी चार ट्र्क्टर अतिक्रमण काढण्यासाठी वापरण्यात येत आहेत.यापुढे भविष्यात कोणीही रस्त्यावर अतिक्रमण करू नये,कायम अतिक्रमण पथक नेमल्याने भविष्यात रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता नगरपालिका घेणार असे निलंगा नगरपालिकेचे मुख्यधिकारी मलिकार्जून पाटील यानी संपर्क साधला असता सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.