हनुमान मूर्तीच्या विटंबने प्रकरणी तरुणास अटक

1 min read

हनुमान मूर्तीच्या विटंबने प्रकरणी तरुणास अटक

सोनपेठ पोलिसांनी अवघ्या दोन तासात तरुणास केले गजाआड

सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ :सोनपेठ तालुक्यातील कोरटेक येथे प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान मूर्तीच्या शेंदूर लेपनास भंगविण्याचा प्रकार झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोनपेठ पोलिसांना माहिती देतात.पोलिसांनी तत्परता दाखवत सदर तरुणास अवघ्या दोन तासात गजाआड केल्याने निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निकाली निघाला आहे यामुळे सोनपेठ पोलीसांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. झालेल्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की सोनपेठ तालुक्यात कोरटेक येथे दक्षिणमुखी जागृत हनुमान देवस्थान आहे ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मात्र कोरोना आजारामुळे सदर धार्मिक कार्यक्रम घेतल्या जात नाहीत.या संधीचा फायदा घेऊन गावातील माथेफिरु तरुण शेख युनुस शेख युसुफ याने ८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास या मंदिरात प्रवेश करून मंदिरात असणाऱ्या हनुमान मूर्तीच्या शेंदुर लेपनास काढत मूर्ती भंग करण्याचा प्रकार केला.व मंदिरातून पळ काढला सदर प्रकार गावातीलच रामेश्वर राधाकिसन नरवाडे यांनी पाहून सोनपेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली असता शेख युनुस याच्याविरुध्द नरवाडे यांच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलीसात भा.द.वी.कलम २९५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्हा दाखल करताच सोनपेठचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.डी.भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी अवघ्या दोन तासात गावातच लपून बसलेल्या या तरुणास अटक करत पुढील कार्यवाही पार पाडली आहे.