पुरुष दिन आणि टॉयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांच्या भन्नाट शुभेच्छा

1 min read

पुरुष दिन आणि टॉयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांच्या भन्नाट शुभेच्छा

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून #InternationalMensDay2020 आणि #WorldToiletDay2020 निमित्त एक ट्विट केले.

मुंबई: आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आणि जागतिक शौचालय दिनानिमीत्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून #InternationalMensDay2020 आणि #WorldToiletDay2020 निमित्त एक मेसेज केला. यामध्ये अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांना त्यांच्या एका आक्षेपार्ह वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे लक्ष्य वेधले आहे.


अमृता फडणवीस यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की,
आज #InternationalMensDay2020 और #WorldToiletDay2020 पर सभी देशभक्त पुरुषों को, एक आम औरत की ओर से निवेदन करती हूँ की आप सब एक होकर, बुरी सोच वाले कुछ नाममात्र ‘naughty’ मर्दो के आचार-विचार की गंदगी फ्लश करके महाराष्ट्र को स्वच्छ रखने में मदत करे! #toiletday #InternationalMensDay

नेमका वाद काय आहे ?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मध्यंतरी अभिनेत्री कंगना रानौत हिच्यावर टीका केली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर’, असे संबोधले होते. यावरुन बराच गदारोळ झाल्यानंतर संजय राऊत यांनी सारवासारव केली होती. मला कंगनाला नॉटी गर्ल म्हणायचे होते. असे संजय राऊत यांनी म्हटले होते.