दिवाळीच्या शुभ मुहूर्त करा 'लक्ष्मी पूजन'

जाणुन घ्या लक्ष्मी पूजेची शुभ वेळ

दिवाळीच्या शुभ मुहूर्त करा 'लक्ष्मी पूजन'

दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते . लक्ष्मी पूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज आम्ही आपल्याला सोपी आणि योग्य पद्धत सांगत आहोत. लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी. तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावीत.

लक्ष्मी पूजन
अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मी ची पूजा करतात. आम्हाला समृध्द करणारी दिव्यता, ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते. ज्या प्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात, त्याप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्रांद्वारे देवी लक्ष्मी ची आराधना करू या आणि त्या द्वारे सकारात्मक लहरी व समृद्धी प्राप्त करू या.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. प्राचीन काळी लोकं ह्या दिवशी आपले सारे धन देवासमोर आणून ठेवीत. सामान्यतः आपले धन बँकेत किंवा लॉकर मध्ये सुरक्षित ठेवल्या जाते. पण प्राचीन काळी लोकं आपले सारे धन समोर पसरवून ठेवत आणि समृद्धी चा आनंद घेत होते. केवळ सोनं, चांदी हेच धन नव्हे तर आपले ज्ञान हे सुद्धा एक धनच आहे. तर ह्या प्रकारे उत्सव साजरा केला जात असे. तुम्हाला आपल्या ज्ञानाचे नीट जतन करायला हवे व त्याबद्दल समृद्धीची भावना हवी. धनत्रयोदशी हा आयुर्वेदाचा दिवस आहे, कारण आपली जडी बुटी व त्या वनस्पती सुद्धा एक प्रकार चे धन आहे. असे म्हणतात की ह्याच दिवशी मानवतेला अमृताची देण मिळाली होती.

तर आजच्या दिवशी तुम्ही खूप सौभाग्यशाली आहात असे मानावे आणि तृप्तीचा अनुभव घ्यावा. जेव्हा जेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजतो तेव्हा आयुष्यात बरेच काही प्राप्त होते. बायबल मध्ये लिहिले आहे की "ज्यांच्या जवळ आहे त्यांना अजून दिल्या जाईल आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्या कडून जे काही थोडं फार आहे तेही हिसकावून घेतल्या जाईल". प्राचीन काळापासून हीच शिकवण आहे की मनात सतत समृद्धी चा भाव जागता ठेवावा. समृद्धी आपल्या आतून सुरु होते व मग ती बाहेर अभिव्यक्त होते. तुम्हाला खूप आशीर्वादाचे पाठबळ आहे, ह्याच भावनेने आज परत जावे.

दिवाळी, शुभ मुहूर्त
निज अश्विन अमावास्या प्रारंभ : शनिवार, १४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०२ वाजून १८ मिनिटे.
निज अश्विन अमावास्या समाप्ती : रविवार, १५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजून ३७ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली, तरी लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळी करणे शास्त्रसंमत असल्यामुळे शनिवार, १४ नोव्हेंबर २०२० रोजी ते करावे, असे सांगितले जात आहे.

लक्ष्मी पूजेसाठी शुभ वेळ
संध्याकाळी ०६:०९ ते ०८:२० पर्यंत.
कालावधी: १ तास ५५ मिनिटे
प्रदोष काळ: १७:३४:०९ ते २०:१०:२७ पर्यंत
वृषभ कालावधी: १८:१०:२९ ते २०:०६:२० पर्यंत


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.