संजय साडेगावकरांचे पुनश्च हरीओम

संजय साडेगावकर भाजपामधुन पुन्हा शिवसेनेत दाखल

संजय साडेगावकरांचे पुनश्च हरीओम

परभणीः भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी सोमवार रोजी भाजपाला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केला.

सेलू तालुक्यातील वालूर येथील साडेगावकर हे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. येथून ते जि. प. सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व करीत होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत साडेगावकर यांनी शिवसेनेकडून जिंतूर विधानसभेतून उमेदवारी मागितली होती. परंतू पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर ते भाजपात गेले होते. भाजपाकडुन त्यांनी निवडणुक लढवली होती. यात ते पराभूत झाले. सध्या ते भाजपात सक्रीय होते. भाजपाचे तालुकाध्यक्षपद त्यांच्याकडे होते. मात्र, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचे भाजपा नेते मा. आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर व बोर्डीकर यांच्या कन्येस उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ते पक्षात अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी शिवसेनेचा पुन्हा मार्ग पत्करला. सोमवारी ते शिवसेनेत दाखल झाले. खा. संजय जाधव यांच्या पक्ष कार्यालयात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, सखुबाई लटपटे आदीची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.