हर्सूल कारागृहाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी 58 लाख 81 हजार रूपये निधी मंजूर

1 min read

हर्सूल कारागृहाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी 58 लाख 81 हजार रूपये निधी मंजूर

कैद्यांसाठी सोलार वॉटर हिटर बसविणार

औरंगाबाद : हर्सूल मध्यवर्ती कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे, उच्च दर्जाचे एलईडी दिवे बसवून हर्सूल कारागृहाची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यासोबतच कैद्यांना सोलार वॉटर हिटर सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 58 लाख 81 हजार 342 रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
कारागृह अधिक्षक हिरालाल जाधव म्हणाले की, कैद्यांसाठी सोलार वॉटर हिटर बसविण्याची अनेक दिवसांची संकल्पना होती. याकरिता कारागृह प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.