कधी पाहिलेत का तलावातील जंगल

1 min read

कधी पाहिलेत का तलावातील जंगल

वास्तविक, या तलावाच्या आत संपूर्ण जंगल वसलेले आहे. हे पाहिल्यावर असे वाटते की झाडे उलट्या दिशेने पाण्यात वाढली आहेत

जगभरात असे असंख्य तलाव आहेत, जे लोकांना त्यांच्या सौंदर्याने आश्चर्यचकित करतात, पण आज आम्ही तुम्हाला अशा तलावाबद्दल सांगणार आहोत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. वास्तविक, या तलावाच्या आत संपूर्ण जंगल वसलेले आहे. हे पाहिल्यावर असे वाटते की झाडे उलट्या दिशेने पाण्यात वाढली आहेत कझाकस्तानमध्ये असलेल्या या तलावाला 'लेक कँडी' असे नाव देण्यात आले आहे. या तलावात विचित्र लाकडी दांडे आहेत. वास्तविक हे झाडांचे भाग आहेत, तर उर्वरित भाग पाण्याखाली बुडालेला आहे. म्हणजेच ही झाडे जंगलाप्रमाणे पाण्याच्या आत अस्तित्वात आहेत.

असे म्हटले जाते की. इ.स. १९११ मध्ये या भागात भयंकर भूकंप झाला होता, त्यामुळे संपूर्ण परिसर प्रचंड विस्कळीत झाला आणि पाण्याने भरून गेला होता त्यामुळे येथील जंगल पाण्यात बुडाले होते. त्या भुकंपाचे रूपांतर नंतर अशा चमत्कारिक तलावात झाले. समुद्रसपाटीपासून सुमारे २ हजार मीटर उंचीवर स्थित या तलावाचे पाणी बरेच थंड आहे. हे झाडांसाठी रेफ्रिजरेटरसारखे कार्य करते. हे चमत्कारिक तलाव कझाकस्तानमधील सर्वात मोठे शहर आलमट्टीपासून २०० किलोमीटरवर आहे.

मोठ्या संख्येने लोक येथे फिरायला येतात. हिवाळी हंगामात हा तलाव बर्फ डायव्हिंग आणि मासेमारीसाठी देखील ओळखला जातो रात्रीच्या वेळी हा तलाव एखाद्या झपाटलेल्या ठिकाणापेक्षा कमी दिसत नाही कारण पाण्यातून बाहेर येणारी झाडे बहुतेक वेळा लोकांना चकित करतात.