1 min read

हे आहेत जगभरातील विषारी जीव

जगभरात असे अनेक प्राणी, पक्षी, किटक आहेत की, त्यांच्या सौंदर्यामुळे ते लोकांना आकर्षित करतात. त्यांना पाहून प्रत्येकालाच कुतूहल वाटते. परंतु याच सौंदर्यामागे काही प्राणी जीवघेणारेही असतात. आज अशाच काही जीवघेण्या जीवांविशयी जाणून घेऊया.

विंचू तर प्रत्येकालाच माहित असेल. काही जणांनी त्याला प्रत्यक्षात पाहिलेही असेल. असे म्हणतात की त्याच्या शेपटीमध्ये विश असते. त्याला भारतीय लाल विंचू म्हणून देखील ओळखले जाते. कारण मुख्यतः हा भारतातच आढळतो. भारतासह दक्षिण आशियातील देश पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळ मध्ये आढळणारा हा विंचू जर एखाद्या व्यक्तिला त्यांने दंश केला तर ७२ तासांमध्ये त्या व्यक्तिचा मृत्यू निश्चित आहे.

फनल वेब स्पायडर (कोळी) मुख्यतः ऑस्ट्रेलियात आढळतात. त्यामुळेच त्यांना ऑस्ट्रेलियन फनल वेब स्पायडर म्हणून ओळखले जाते. सायनाइडपेक्षाही याचे विष जास्त धोकादायक असते. असे म्हणतात की, हा स्पायडर कुणाला चावला तर १५ मिनिटापासून ते तीन दिवसाच्या आत त्या व्यक्तिचा मृत्यू निश्चित आहे.

गोगलगाय प्रत्येकाने पाहिली असेल. जी शंकूमध्ये दिसते. वास्तविक पाहिले तर गोगलगाय पासून जीवाला धोका होवू शकतो यावर कदाचित कुणाचाच विश्वास बसणार नाही परंतु खरचं गोगलगाय भयावह आहे. गोगलगायमुळे कुणालाही अर्धांगवायू उद्भवू शकतो. जगभरात ६०० पेक्षाही जास्त गोगलगायची प्रजाती आढळते. परंतु सर्वात विषारी ही शंकूतील गोगलगाय असते.

ऑक्टोपस बद्दल प्रत्येकालाच माहित असेल, जगभरात यांची तीनशेपेक्षा जास्त प्रजाती आहेत. परंतु यात ब्लू रिंग्ड ऑक्टोपस सर्वात भयावह आणि विशारी आहे. असे म्हणतात की, या ऑक्टोपसचे विश माणसाला ३० सेंकदातच मारू शकतो. याच्या एका चाव्यामध्येच इतके विष असते ज्यामुळे एकाचवेळी २५ लोकांचा मृत्यू होवू शकतो. हिंदी महासागर आणि ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात हे ऑक्टोपस आढळतात.

जेलीफिश ही मुख्यतः भयावहच असते परंतु बॉक्स जेलीफिश खुपच विषारी असते. जगभरात आतापर्यंत जेवढ्या काही विषारी जीव-जंतुचा शोध लागला आहे, त्यापैकी ही सर्वात विषारी जेलीफिश आहे. असे म्हणतात की, या फिशचे विष एकाचवेळी ६० लोकांना मृत्यूच्या दारात उभे करू शकतात. एकदा का या फिशचे विष व्यक्तिच्या शरीरात गेले तर एका मिनिटातच त्या व्यक्तिचा मृत्यू होणे निश्चित आहे.