गळ्याला चाकू लावून भररस्त्यात लूटले

निटूर लातूर महामार्गावर हाणमंतवाडी गावच्या जवळ लूटमार चाकू लावून दुचाकीस्वाराला लूटले, एका आरोपीस नागरीकांनी पकडले तर पाच आरोपी च्या चार तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या

गळ्याला चाकू लावून भररस्त्यात लूटले

विजय देशमुख/ निटूर: निलंगा तालूक्यातल्या निटूर-लातूर महामार्गावर सहा आरोपींनी हाणमंतवाडी गावात जाणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकीस्वारास अडवून गळ्याला चाकू लावून खिशातील रोख रक्कम पंधरा हजार व मोबाईल घेवून त्याच्या दुचाकीची चावी घेवून पसार झाले ही घटना मंगळवारी रात्री नऊ च्या दरम्यान घडली. अशी लूटीची घटना घडल्याने परीसरात घबराहटीचे वातावराण पसरले आहे.

प्रदीप कदम रा.हाणमंतवाडी ता. निलंगा येथिल तरूण लातूरला दुकानात नौकरी करतो रोजच्या प्रमाणे प्रदिप हा लातूरहून आपल्या हाणमंतवाडी या गावाकडे निघाला रात्री नऊ च्या दरम्यान सहा आरोपींनी प्रदिप ला अडवून गळ्याला चाकू लावून पंधरा हजार रूपये मोबाईल व एटिएम कार्ड काढून घेतले .सदरील घटना घडल्यानंतर प्रदिप हा गावात जावून हा प्रकार मित्राना सांगितला त्यानंतर गावातील कांही मित्रांनी आरोपींना शोधन्यासाठी निटूर गाठले त्यावेळी त्यातील पाच आरोपी दोन दुचाकीवर निटूरहून लातूरकडे जाताना दिसले त्यामुळे निटूर ते ताजपूर पाटीच्या जवळ प्रदिप च्या मित्रांनी यांना पकडले यातील एक आरोपी रूषीकेश शेवाळे रा. हडपसर पुणे या आरोपीला पकडले बाकी पाच जण फरार होण्यात यशस्वी झाले.

दरम्यान घटनास्थळावर आरोपींची दुचाकी पडली असून निटूर पोलिसांनी त्याचा पंचनामा केला आहे.
निटूर लातूर महामार्गावर रात्री नऊ च्या दरम्यान घटना घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
हाणमंतवाडी ग्रामस्थांनी एका आरोपीला पकडून निटूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे त्या नंतर शिरूर अनंतपाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पी. बी. कदम , पोलिस उपनिरीक्षक मलय्या स्वामी पो. जमादार सत्यवान कांबळे पोलिस कॉंस्टेबल साठे यांनी पकडलेल्या आरोपीला ला माहीती विचारून दापका ता.निलंगा येथे कोंबींग आॕपरेशन करून समाज मंदिरात लपलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले त्यामध्ये राजकुमार पवार भेकराई नगर फुरसुंगी पुणे सध्या रा. लांबोटा ता. निलंगा ,शुभम गायकवाड रा.येरवडा, देवाची उरळी पुणे, सुनिल मोरे रा. लांबोटा ता. निलंगा ,अशोक शिंदे रा. आकाशवाणी लोखंडी पूल हडपसर पुणे, नागेश निलेवाड रा. ढोले वस्ती हवेली पुणे यांना ताब्यात घेतले घटना घडल्यानंतर अवघ्या चार तासात शिरूर अनंतपाळ पोलिसांनी आरोपीला अटक केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान चार दिवसापूर्वी निलंगा येथे जबरी चोरी झाली होती व एकाला चाकू मारून लूट करण्यात आली होती त्या घटनेचा या आरोपीचा काही संबध आहे काय हे सध्या तपासले जात आहे .
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस प्रमुख निखील पिंगळे यांनी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याला भेट दिली असून अतिरीक्त पोलिस अधिक्षक हे ठाण्यामध्ये ठाण मांडून आहेत.सहा आरोपी पैकी तिघांचे गुन्हेगारी रेकाॕर्ड असल्याचे पोलिसांनी सांगितले .घडल्या घटनेची फिर्याद प्रदिप कदम यांनी दिली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.