पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सुकामेवा खाणे चांगले असते, हेल्दी असते, हे आपण जाणतो. पण तो फारसा खाल्ला जात नाही. म्हणून, मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल.

कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असून पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. म्हणून, रोस्टेड, खारवलेले पिस्ता तुम्ही खाऊ शकता.

पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे –
१. पिस्त्यात असलेल्या फॅटी अ‍ॅसिडमुळे त्वचेचा नैसर्गिक रंग उजळतो.

२. सतत बसून टीव्ही पाहणे, तासंतास कॅम्प्युटरवर काम करणे आणि वाढत्या वयानुसार डोळ्याची दृष्टी कमकुवत होते. पिस्ता डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतो.

३. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो. हृदयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरत. हे कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्यात असणारे गुणधर्म हृदयाचे आरोग्य चांगले राखते.

४. चेहऱ्याचे सौंदर्य राखण्यासाठी पिस्ता गुणकारी ठरतो. हे एखाद्या नैसर्गिक औषधापेक्षा कमी नाही. वाढत्या वयाची लक्षण रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो.

५. डायबिटीज वाढण्यापासून रोखण्याच काम करतो. यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे साखर नियंत्रणात राखण्यास मदत होते.

६. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी पिस्ता खाणे फायदेशीर ठरते. काजू, बदाम पेक्षाही जास्त पौष्टिक असतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून लहान मुलांना पिस्ता खाण्यासाठी देणे चांगले आहे.

७. शरीरावर सूज आल्यास पिस्त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरत. यात असलेल्या व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई मुळे सूज कमी होण्यास मदत होते.

८. मूठभर पिस्ता खाल्याने पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच त्यातील व्हिटॅमीन बी ६, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस मुळे अन्नपचनाची क्षमता सुधारते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.