आंबाचे आरोग्यदायी फायदे

आंबा खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे देखिल आहेत.

आंबाचे आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्यात वाढणारा उन्हाचा तडाखा, सतत येणारा घाम, वाढणारे पित्ते आणि घामोळ्या हे सारे त्रासदायक असले तरीही रसदार आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रत्येकाला उन्हाळाला हवाहवासा वाटतो. हापुस, तोतापुरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके मधूर असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात.

आंबा खाण्याचे फायदे

  • आंबा खाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे आंबा त्वचेला आतून साफ करतो. आंब्यात भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि विटॅमिन ए असते. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते.

  • आंब्यात विटॅमिन सी, ए आणि विविध प्रकारचे कॅरोटेनॉइड असतात. तसेच जिंक मोठ्या प्रमाणात असेत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

  • आंबा विटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेट ठेवतो. एका अभ्यासात शरीराचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.

  • अॅनीमियाच्या रुग्णांसाठी आंबा नैसर्गिक वरदान आहे. आंब्यात असणारे लोह शरीरासाठी फायदेशीर आहे. आर्यन आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी आंबा अतिशय गुणकारी आहे.

आंबा खाण्याचे तोटे

  • आंब्याला लवकर पिकवण्यासाठी त्यात अनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो. आंबा खाण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो पण केवळ पाण्याने धुण्यामुळे त्यावरील केमिकल पूर्णत: नष्ट होत नाही.

  • एका मध्यम आकाराच्या आंब्यात १३५ कॅलरीज असतात. अधिक प्रमाणात आंबा खाल्याने वजन वाढते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.