जळगाव: महाराष्ट्रातील जळगाव येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार अल्पवयीन मुलांची अज्ञात व्यक्तीने कु-हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. मुलांचे आई-वडील कामानिमित्त मध्य प्रदेशात होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व शोकांचे वातावरण आहे.
जळगावच्या बोरखेडा गावात हे कुटुंब मुस्तफा नावाच्या व्यक्तीची शेती करीत असे. हे कुटुंब महाराष्ट्रातील जळगाव येथे मध्य प्रदेशातून नोकरीच्या शोधात आले होते. मेहताब आणि त्याची पत्नी रुमलीबाई भिलाला आणि चार मुले असा त्यांचा परिवार होता. मृत्युमुखी पडलेल्या मुलांमध्ये 12 वर्षाची मुलगी सैता, 11 वर्षाचा रावल, 8 वर्षाचा अनिल आणि 3 वर्षाची सुमन या चार मुलांचा मृतदेह मुस्तफाच्या मालकाच्या शेतात लटकलेला अवस्थेत आढळला.
सुरुवातीच्या तपासणीत चारही मुलांची हत्या कु-हाडीने केली असल्याचे उघडकीस आले. संपूर्ण परिसर सील करून पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.