निलंगा तालूक्यात पावसाचा धुमाकूळ

मसलगा मध्यम प्रकल्पाचे सहा तर डोंगरगाव धरणाचे सर्व दारे खूले , शेकडो हेक्टर पीके पाण्यात सरसकट मदतीची शेतक-यांची मागणी

निलंगा तालूक्यात पावसाचा धुमाकूळ

 

निटूर / विजय देशमुखः निलंगा तालूक्यात गेल्या कांही दिवसापासून पावसाने शेतक-यांची दैना केली असून त्यातच दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आला आहे. नदी पाञाच्या बाहेर पाणी पडले असल्यामुळे शेकडो हेक्टर पीके पाण्याखाली आली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या  खरीप हंगामावरच पाणी फिरल्याचे  विदारक चिञ सध्या दिसत आहे.

मसलगा मध्यम प्रकल्पाचे सहा दरवाजे वीस सेंटीमीटरने खूले करण्यात आले असून  115. 86 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सध्या करण्यात येत आहे तर डोंगरगाव धरणामधून सहा दरवाजे पूर्ण क्ष मतेने खूले करण्यात आले असून त्यामुळे धरणातून 2232 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे  मांजरा नदीला पूर आला आहे .निटूर व परीसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून दोन दिवसात 200 मी. मी. पावसाची नोंद निटूरच्या पर्जन्य मापकावर करण्यात आली आहे  .

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पिकेही चांगली आली होती माञ दररोज पडत असलेल्या पावसामुळे नद्या, ओढे भरून वाहत असल्याने मसलगा मध्यम  प्रकल्प भरला असून डोंगरगाव धरणही पूर्ण भरले आहे. त्यामुळे या दोन्ही धरणाचे दरवाजे खूली करण्यात आली आहेत. याचा परिणाम म्हणजे मांजरा नदीला पूर आला आणि हजारो हेक्टर सोयाबीन सह खरीपाची पिके पाण्याखाली गेली आहेत.गेल्या कांही दिवसापासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हाताशी आलेले सोयाबीन पीक डोळ्यादेखत पाण्यात वाहुन गेले,  तुरीचे पिकही जळून गेल्याने शेतकरी हताश झाला असून सरकारने आता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.